आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Alok Nath Did Steamy Scenes With Tina Ambani: Sanskari Babuji Alok Nath Affair With Sonam Kapoor On Screen Mother Neena Gupta, After Breakup He Got Arrange Married

#AlokNath: सोनम कपूरच्या ऑनस्क्रिन आईसोबत होते अफेअर, ब्रेकअपनंतर आईच्या इच्छेनुसार केले होते अरेंज मॅरेज : 10 Unseen Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

90 च्या दशकातील प्रसिद्ध मालिका 'तारा'च्या लेखिका आणि निर्मात्या विंटा नंदा यांनी संस्कारी बाबुजी या नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप लावला आहे. 1960 मध्ये दिल्लीत जन्मलेल्या आलोक नाथ यांच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींपासून सर्वसामान्य अनभिज्ञ आहेत. आलोक नाथ जेव्हा दिल्लीहून मुंबईत शिफ्ट झाले होते आणि त्यांचा संघर्षाचा काळ सुरु होता, त्याकाळात त्यांची भेट अभिनेत्री नीना गुप्तासोबत झाली होती. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांच्या अफेअर आणि ब्रेकअपसंदर्भातील याहून अधिक माहिती उपलब्ध नाहीय. पण असे म्हटले जाते की, करिअरवर लक्ष केंद्रित करण्यासाठी दोघांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला होता. नीना आणि आलोक नाथ यांनी 'गांधी' (1982) आणि 'अंत' (1994) या चित्रपटांमध्ये काम केले. आलोक नाथ यांनी त्यांच्या आईवडिलांच्या इच्छेनुसार अंशू सिंह या बिहारी तरुणीसोबत लग्न केले आणि सेटल झाले. ब्रेकअपनंतर नीना गुप्ता यांचे अफेअर  म्युझिशियन शारंगदेव आणि वेस्ट इंडीजचे क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांच्यासोबत होते. 

 

टीना अंबानींसोबत दिले होते लव्ह मेकिंग सीन्स... 
- आलोक नाथ यांनी करिअरच्या सुरुवातीपासूनच 'संस्कारी बाबूजी' धाटणीच्या भूमिका साकारल्या असे नाही. सुरुवातीच्या काळात त्यांनी लव्ह मेकिंग सीनदेखील दिले होते.
- 1987 मध्ये आलेल्या 'कामाग्नि' या चित्रपटात आलोक नाथ अभिनेत्री टीना मुनीम (आता अंबानी) सोबत रोमान्स करताना दिसले होते. 
- आलोक नाथ यांनी त्यांच्या अभिनय करिअरची सुरुवात 1980 मध्ये आलेल्या 'रिश्ते नाते' या मालिकेतून केली होती. या शोमध्ये त्यांची बाबुजीची भूमिका होती. त्यांना खरी ओळख ही गाजलेल्या 'बुनियाद'(1986) या मालिकेतील मास्टर हवेलीरामच्या भूमिकेतून मिळाली. 
- आलोक नाथ यांनी टीव्हीवर 'भारत एक खोज' (1988), 'रिश्ते' (1999-2001), 'वो रहने वाली महलों की' (2005), 'सपना हर बाबुल का...बिदाई' (2007-10) आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' (2015-16)  यांसह अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले आहे. 


स्वतःपेक्षा 14 वर्षांनी मोठ्या अमिताभ बच्चनच्या वडिलांची साकारली होती भूमिका...
- 1990 मध्ये आलोक नाथ यांनी 'अग्निपथ' या चित्रपटात अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या वडिलांची भूमिका साकारली होती. त्यावेळी आलोक नाथ 34 वर्षांचे तर अमिताभ 48 वर्षांचे होते.
- त्यापूर्वी त्यांनी 1989 मध्ये आलेल्या राजश्री प्रॉडक्शनच्या 'मैंने प्यार किया' या चित्रपटात अभिनेत्री भाग्यश्रीच्या वडिलांची भूमिका वठवली होती. 


पुढील स्लाईड्सवर बघा, आलोक नाथ यांचे Unseen Photos

 

बातम्या आणखी आहेत...