आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद : "बात करो तो लफ्जो से भी खुशबू आती है, लगता है के उस लडकी को भी खुशबू आती है'... अशा मस्त गझल सादर करीत प्रसिद्ध गीतकार, गझलकार, पत्रकार आलोक श्रीवास्तव यांनी रसिकांना रिझवले. टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात हा कार्यक्रम झाला. श्रीवास्तव यांनी त्यांच्या गझलेचा प्रवास सांगितला. अनुज खेर यांनी त्यांना बोलते केले. श्रीवास्तव यांनी बालपणी घेतलेल्या जगजितसिंग यांच्या भेटीची आठवण सांगितली. अवघ्या सोळाव्या वर्षी मध्य प्रदेशातील विदिशा ते मुंबई असा प्रवास करीत जगजितसिंग यांच्या घरी कसा पोहोचलाे आणि माझी गझल तुम्ही गायली पाहिजे असा हट्ट धरल्याचा किस्सा सांगताना त्यांचे डोळे पाणावले.
दृष्टी असली तरच शायर निर्माण होतो...
तुम्ही शायर कसे झाला? गझल, पत्रकारिता हे सगळं कसं जमून आलं, या प्रश्नावर ते म्हणाले की, आजूबाजूचे लोक, घरातले लोक यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने ज्याला पाहता येते तो शायर होऊ शकतो. सुचते तेच शब्दांत मांडायचे. बालपणापासून छान संगत मिळाल्याने मी घडलो. १५ व्या वर्षी कविता, गझल तयार करण्यास शिकलो. वडिलांना घाबरायचो, पण आई माझ्या कविता, गझला ऐकून अमीन असे म्हणायची. माझा उत्साह वाढत गेला आणि पुढे मोठा प्रवास सुरू झाला.
बात करो तो लफ्जो मे भी खुशबू आती है,
लगता है के उस लडकी को भी उर्दू आती है
तनहाई में भी अकसर खुशबू आती है।
ये सोचना गलत है के तुमपर नजर नही
महफुज हम बहोत है मगर बेखबर नही...
अशा काही गझल सादर करीत त्यांनी रसिकांची वाहवा मिळवली. त्यानंतर छोट्या पडद्यावरील त्यांची केबीसीमधील एन्ट्री, अमिताभ बच्चन यांच्यासोबत झालेला संवाद आणि गझलसम्राट जगजितसिंग यांनी गायलेल्या आलोक श्रीवास्तव यांच्या गझलांचा व्हिडिओ दाखवण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.