आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Although Facebook Is Not Installed On Mobile, Your Data Reaches Facebook

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोबाइलवर फेसबुक इन्स्टॉल केले नसले तरी फेसबुकपर्यंत पोहोचताे तुमचा डाटा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बर्लिन- युजर्सचा डाटा विकल्याचा आरोप असलेल्या फेसबुकवर आता डाटाचोरीचाही आरोप झाला आहे. ब्रिटेनच्या चॅरिटी प्रायव्हसी इंटरनॅशनल संस्थेच्या अहवालानुसार ज्यांनी मोबाइलवर फेसबुक इन्स्टॉल केलेले नाही, त्यांचीही माहिती फेसबुक चोरत आहे. फेसबुक अनेक लोकप्रिय अॅप्सच्या माध्यमातून हा प्रताप करते. संस्थेने १ ते ५० कोटी वेळा इन्स्टॉल झालेल्या ३४ अॅप्सची तपासणी केली. यापैकी २३ अॅप डाटा चोरून तो फेसबुकपर्यंत पोहोचवत आहे. 

 

हा डाटा कंपन्या विकत घेतात, युजर पॅटर्न पाहून जाहिराती दाखवल्या जातात 
डाटाचोरी अशी: बहुतांश अॅप डेव्हलपर कंपन्या फेसबुक सॉफ्टवेयर डेव्हलपमेंट किटचा (एसडीके) वापर करत आहेत. जे काही अॅप्स एसडीकेद्वारे डेव्हलप झाले ते सर्व फेसबुकशी कनेक्ट आहेत. युजर जितक्या वेळी अॅपचा वापर करतो, तितक्या वेळेस त्याचा खासगी डाटा फेसबुकपर्यंत पोहोचतोे. अशा प्रकारच्या डाटाची होत आहे चोरी मोबाइल फोनमध्ये सेव्ह केलेले क्रमांक फोनमधील फोटो-व्हिडिओ  ईमेल्स तुम्ही कोणकोणत्या वेबसाइट्स किती वेळा पाहता किंवा पाहिल्या आहेत अॅप्सवर कोणत्या प्रकारची माहिती सर्च करता आदी. 

 

२३ पैकी ५ अॅप्स असे : 
भाषा शिकवणारे अॅप ड्युओलिंगो, ट्रॅव्हल अँड रेस्तराँ अॅप - ट्रिप अॅडव्हायझर, जॉब डाटाबेस इनडीड आणि फ्लाइट सर्च इंजिन स्काय स्कॅनर या अॅप्सची नावे समोर आली आहेत. अहवाल मांडणाऱ्या संस्थेने उर्वरित १८ अॅप्सची माहिती अद्याप जाहीर केलेली नाही.