आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Although Homework Is Not Done, Children Must Sleep After 10 O'clock; Parents Called It A Homework Curfew

गृहपाठ झाला नसला तरी 10 वाजेनंतर मुलांनी झोपणे आवश्यक; पालकांनी याला होमवर्क कर्फ्यू म्हटले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग : चीनमध्ये सध्या शिक्षण व्यवस्थेवर जोरदार चर्चा सुरू आहे. शाळकरी मुलांसाठी आणलेला एक प्रस्ताव याला कारण आहे. यात गृहपाठाऐवजी झोपण्याला महत्त्व देण्यात आले आहे.


येथील शाळकरी मुलांसाठी नवीन नियम लागू करण्यात आला आहे. ज्यात सर्व मुलांना १० वाजेच्या आधी झोपणे आवश्यक केले आहे. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी बिछान्यात जाण्याची वेळ ९ ची सुचवण्यात आली आहे. गृहपाठ पूर्ण झाला नसला तरी. पालकांनी याला विरोध केला आहे. त्यांनी याला 'होमवर्क कर्फ्यू' असे नाव दिले आहे. आई-वडिलांचे म्हणणे आहे की, यामुळे मुले स्पर्धेत मागे पडतील. पूर्व झेजियांग प्रांताच्या शिक्षण विभागाने ३२ सूत्री असलेले दिशानिर्देश प्रसिद्ध केले आहेत. यात विद्यार्थ्यांसाठी पालकांच्या परवानगीने ठरावीक वेळी झोपण्याचा सल्ला दिला आहे. मग त्यांच्या शाळेने दिलेला गृहपाठ पूर्ण झालेला असेल किंवा नसेल. यात पालकांना सल्ला देण्यात आला आहे की, दुसऱ्याशी स्पर्धा करू नका. तसेच आठवड्याच्या शेवटी आणि सुट्यांमध्ये मुलांकडून जास्तीचा अभ्यास करण्यात येऊ नये. चिनी शाळकरी मुलांना गृहपाठ जास्त असतो. आई- वडिलांकडून मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर कार्यक्रमांमध्येही सहभागी केले जाते. हे सर्व चीनच्या विद्यापीठात प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी केले जाते. ही सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. विद्यापीठात प्रवेशाचा हा एकच पर्याय उपलब्ध आहे. यामुळे आई-वडील मुलांवर यासाठी दबाव आणतात.


मुले मागे पडण्याची पालकांना चिंता: या प्रस्तावामुळे चीनमध्ये वादाला सुरुवात झाली आहे. पालकांना चिंता आहे की, मुलांवरील गृहपाठाचा भार कमी झाल्याने ते स्पर्धेत मागे पडतील. त्यांचे म्हणणे आहे की, सध्याचे युग परीक्षेवर आधारित आहे. यामुळे मुलांना निवांत राहू देता येत नाही. सोशल मीडियात पालकांनी म्हटले आहे की, अशा नियमांकडे दुर्लक्ष करायला हवे.
घड्याळात दहा वाजले, आता गृहपाठ गुंडाळा.