आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर प्रदेशात ३ पक्ष एकत्र आले तरी ७४ जागा जिंकू; राज्य भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत शहांचे मार्गदर्शन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेरठ- देशातील राजकीयदृष्ट्या सर्वात महत्त्वाचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपने २०१९ च्या निवडणुकीची तयारी ९ महिने आधीच सुरू केली आहे. रविवारी मेरठमध्ये झालेल्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी संबोधित केले. शहा म्हणाले की, विरोधकांशी दोन हात कसे करायचे याची काळजी माझ्यावर सोडून द्या. तुम्ही फक्त मोदी-योगी सरकारच्या योजना सर्वात खालच्या स्तरावर घेऊन जा. संभाव्य महाआघाडी हे पक्षासाठी आव्हानच नाही. सपा-बसप एकत्र आल्यास काय होईल, या प्रश्नावर माझे उत्तर असे आहे की, आम्ही सपा, बसप, काँग्रेसला एकाच वेळी पराभूत केले आहे. २०१७ मध्ये आम्ही निवडणूक लढवली होती तेव्हा दोन मुलांनी हातमिळवणी केली होती, पण आम्ही ३०० पेक्षा जास्त जागा जिंकल्या. हे तिघे पुन्हा एकत्र आले तरीही भाजप ७४ जागा निश्चितच जिंकेल. शहा यांनी एनआरसी मुद्द्यावरून विरोधकांवर हल्ला सुरूच ठेवला. ते म्हणाले, आम्ही बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात निर्णय घेतला तेव्हा विरोधकांनी वाद सुरू केला. आमचे नेते नरेंद्र मोदींनी ५६ इंची छाती दाखवली आहे. 


गरज भासल्यास राज्यातही आणू एनआरसी : योगी 
आसाममधील एनआरसीचा मुद्दा आता उ. प्र. तही निवडणूक मुद्दा होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे प्रदेश भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत एनआरसीवर एक पूर्ण सत्र ठेवण्यात आले. त्यात माजी केंद्रीय मंत्री कलराज मिश्र यांनी काही बाबींचा उल्लेख केला. हे मुद्दे कार्यकर्त्यांना जनसामान्यांपर्यंत पोहोचवायचे आहेत. शहा यांच्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे भाषण झाले. ते म्हणाले की, गरज भासली तर राज्यातही एनआरसी लागू करू. 


भाजप कार्यकर्ते म्हणजे अर्जुन, महाभारत आम्हीच जिंकू 
पोटनिवडणुकीतील निकालांबद्दल शहा म्हणाले की, मतांत फक्त ५ टक्क्यांचा फरक होता. मोदींना निवडण्याची वेळ येईल तेव्हा आम्ही ५१% मतांचे उद्दिष्ट साध्य करू. आमचे कार्यकर्ते खूप कष्टाळू आहेत. महाआघाडी त्यांच्यासमोर टिकाव धरू शकणार नाही. महाभारतात पहिल्या ५ ते ६ दिवसांत निकाल काहीही लागले तरी १८ व्या दिवशी अर्जुनच जिंकला होता. आमचा प्रत्येक कार्यकर्ता म्हणजे अर्जुनच आहे. पुन्हा एकदा मोदींना पंतप्रधान बनवले तर घराणेशाहीचा रोगच नष्ट होईल. 

बातम्या आणखी आहेत...