Home | Business | Industries | aluminium rate collapsed

ऍल्युमिनिअमच्या दरात घट

Agency | Update - May 22, 2011, 01:22 PM IST

ऍल्युमिनीयमचे उत्पादन करणारी सार्वजनिक क्षेत्रातील तिसरी सर्वात मोठी कंपनी नाल्कोने ऍल्युमिनीअमचे दर प्रती टनामागे ४५ रुपयांनी कमी केले आहेत.

  • aluminium rate collapsed

    भुवनेश्वर - ऍल्युमिनीयमचे उत्पादन करणारी सार्वजनिक क्षेत्रातील तिसरी सर्वात मोठी कंपनी नाल्कोने ऍल्युमिनीअमचे दर प्रती टनामागे ४५ रुपयांनी कमी केले आहेत.

    मागच्या आठवड्यात देखील कंपनीने ऍल्युमिनीयमच्या किमतीत टनामागे ६५ रुपयांची घट केली होती असे कंपनीच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे. लंडन मेटल एक्सचेंजमध्ये किंमती कमी झाल्याने कंपनीने हे पाऊल उचलले असून, आता घरगुती बाजारात ऍल्युमिनीयमची किंमत एक लाख ४१ हजार २ रुपये प्रती टनांपर्यंत आली आहे. ऍल्युमिनिअमच्या भांड्यांच्या किंमतीही आता कमी होण्याची शक्यता, नाल्कोच्या अधिकाऱ्याने व्यक्त केली.

Trending