आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सदैव सकारात्मक दृष्टिकोनामुळे कार्यक्षमता ७२% तर रोगप्रतिकारक शक्ती ५२% वाढते

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


हॅपिनेसमध्ये हीलिंग पाॅवर, ९० देशांकडून हॅपिनेस थेरपीचा वापर 
९० पेक्षा जास्त देशांनी हॅपिनेस थेरपी अवलंबली असून यात रुग्ण आणि नर्स ग्रुप डान्स, विनोद आणि गळाभेट घेऊन सकारात्मकता वाढवतात. 


२० मिनिटे चालल्यास आनंद वाढतो 
मेंदूच्या हिम्पोकॅम्पस या भागात सकारात्मकता निर्माण होते. न्यूरॉन्सद्वारे ती संपूर्ण शरीरात पसरते. मेंदूतील न्यूरोकेमिकल डोपामाइन वेगाने स्रवल्यास सकारात्मकता वाढते. या स्रावात बिघाड झाल्यास नकारात्मकता वाढते. शास्त्रज्ञांच्या मते, आहारात दूध, केळी आणि पोल्ट्री प्रॉडक्टने सकारात्मकता वाढते. 

 

आयआयटी, हार्वर्ड सारख्या ५० संस्थांमध्ये सकारात्मकता शिकवली जाते. वर्षाला १०० संशोधने होतात. १९९८ मध्ये अमेरिकेचा पहिला अभ्यासक्रम आला. 

 

बसण्यापेक्षा चालण्यात आनंद 
निसर्गात राहिल्याने आनंद मिळतो. जपानसह अनेक देशांनी फॉरेस्ट बाथिंग सुरू केले आहे. यात जंगलातून फिरवले जाते. यामुळे गुन्हेगारी कमी झाली. 


१६ व्या वर्षी आनंदाची पातळी सर्वाधिक 
संशोधकांच्या मते, १६ ते १८ वर्षे वयात माणूस सर्वाधिक आनंदी असतो. ५० व्या वर्षी ही पातळी कमी होते. सकारात्मकतेवरील पाच शास्त्रीय संशोधने पुढीलप्रमाणे- 
> समस्या सोडवण्याची क्षमता वाढते : स्टॅनफोर्ड विद्यापीठाने ७-१० वर्षे वयाच्या मुलांचा मेंदू अभ्यासून निष्कर्ष काढला की, जास्त सकारात्मकतेमुळे गणितातील आकलनक्षमता व ते सोडवण्याच्या क्षमतेत वेगाने विकास होतो. 
> नेतृत्वक्षमता वाढते : सकारात्मक लोक मनमिळाऊ असतात. कामाच्या ठिकाणी किंवा कुठेही त्यांना नेतृत्वाची संधी मिळते. 
> यशाची संधी ५८% जास्त मिळते : बोस्टन विद्यापीठाच्या संशोधनानुसार, सकारात्मक लोकांची कार्यक्षमता ७२% जास्त असून यशस्वी होण्यासाठी त्यांना ५८% जास्त संधी मिळतात. 
> विश्वासाने नाते निभावतात : प्रिन्स्टन विद्यापीठानुसार, आनंदी लोक नातेसंबंधातही विश्वासू असतात. त्यांचे घटस्फोट कमी होतात. 
> हृदयविकार, मधुमेहाचा धोका कमी : हार्वर्ड विद्यापीठानुसार, सकारात्मक राहिल्यास प्रतिकारशक्ती ५२% वाढते. हृदयविकाराची शक्यता ३९ % कमी होऊन आयुष्य ८ वर्षांनी वाढते. 


सकारात्मक बातम्या १० मिनिटे वाचल्यास आनंदाच्या पातळीत ६०%वाढ 
पेन्सिल्व्हेनिया विद्यापीठाच्या संशोधनानुसार, दररोज ५ ते १० मिनिटे सकारात्मक बातम्या वाचल्यास व त्या शेअर केल्यास माणसात आनंदाची पातळी ६० टक्के वाढते. दिवसभर प्रफुल्लित असल्याचा अनुभव येतो. यामुळेच जगात सकारात्मक बातम्याच सर्वाधिक शेअर होत आहेत. न्यूयॉर्क टाइम्सच्या अध्ययनात हे सिद्ध झाले. त्यांनी मागील ३ महिन्यांत सर्वाधिक शेअर झालेल्या ७ हजार बातम्यांचे अध्ययन केले. 

 

आनंदी राहण्याच्या ५ व्यवहार्य पद्धती 
थ्यू रिकर्ड : जगातील सर्वात आनंदी व्यक्ती. स्वत:वर ४५ वर्षे अभ्यास केल्यानंतर त्यांनी पुढील पाच पद्धती सांगितल्या.

 
1. नेहमीच स्वत:विषयी विचार करणे दु:खदायी असते. इतरांची मदत व दान केल्याने आनंद मिळतो. 
2. दर तासाला १० सेकंद हात वर करून शरीराला ताण द्या. स्नायू मोकळे होतात व आनंदाची रसायने सक्रिय होतात. 
3. घर किंवा कामाच्या ठिकाणी विनोदी चित्र लावा. ताण आल्यास त्याकडे १ मिनिट पाहा. यामुळे ताण हळूहळू कमी होतो. 
4. चॉकलेट आणि अक्रोडमध्ये पॉलीफिनोल्स असतात. यामुळे मेंदूतील सकारात्मकता स्रवणारा भाग सक्रिय होतो. 
5. निराश वाटल्यास विनाकारण हसा. यामुळे मेंदूतील सकारात्मकतेसाठीच्या वाहिन्या सक्रिय होतात. 
 

बातम्या आणखी आहेत...