Home | Business | Business Special | Always told economical details to your wife for better future

पैशांबाबत पत्नीला नक्की सांगा या 5 गोष्टी, नसता होऊ शकते तुमचे मोठे नुकसान

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 12, 2018, 12:00 AM IST

पत्नीला नीट माहिती दिली नाही आणि काही दुर्घटना घडली तर तुमच्या पत्नीला आर्थिक बाबतीत अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

 • Always told economical details to your wife for better future

  नवी दिल्ली - तुमची पत्नी ही केवळ तुमची लाईफ पार्टनर नसते तर फायनान्शिअल पार्टनरही असते. जर तुम्ही तुमच्या आर्थिक गोष्टींबाबत पत्नीला माहिती दिली तर त्याचे अनेक फायदे असतात. अनेकदा अशी माहिती संकटाच्या काळात कामी येतस असते. त्याशिवाय जर तुम्ही तुमच्या पत्नीला फायनान्शिअल प्लानिंग आणि सेव्हींगबाबत नीट माहिती दिली नाही आणि काही दुर्घटना घडली तर तुमच्या पत्नीला आर्थिक बाबतीत अडचणींचा सामना करावा लागू शकतो.


  #अकाउंट डिटेल आणि पासवर्ड
  दोन्ही पार्टनर्सना एकमेकांचे अकाऊंटनंबर आणि पासवर्ड माहिती असायला हवे. आजकाल बहुतांश व्यवहार ऑनलाइन होतात. त्यामुळे दोघांच्या अकाऊंटचे लॉगइन डिटेल आणि पासवर्ड याबाबत माहिती असायला हवी. पत्नी एकटी असेल तर गरज पडल्यास तिला त्याचा वापर करता यावा यासाठीही हे गरजेचे आहे. त्याशिवाय पत्नीबरोबर पीएफ, डीमॅट अकाउंट, क्रेडीट कार्ड आणि म्युच्युअल फंड, इंश्युरन्स पॉलिसी आणि इनकम टॅक्सबाबतही माहिती शेअर करा.


  गुंतवणूक आणि नॉमिनी
  पत्नीला गुंतवणुकीबाबत पूर्णपणे माहिती देणे गरजेचेच ठरते. मग ती माहिती म्युच्युअल फंडबाबत असो, बँक डिपॉझिट, पोस्ट ऑफिस स्कीम किंवा रियल स्टेट अशी कोणतीही असो. तसेच त्याचबरोबर नॉमिनी म्हणून पत्नीचे नाव द्या त्यामुळे अडचणीच्या काळात त्याचा वापर होऊ शकतो.


  इंश्युरन्स पॉलिसी
  पॉलिसीबाबतही पत्नीला माहिती देऊन ठेवायला हवी. तसे केल्यास तुम्हाला प्रिमियम देणे अगदी सोपे होईल. कारण चुकून तुम्ही विसरले तरी पत्नी ते पुढे सुरू ठेवू शकते.

  पुढे वाचा, अशीच महत्तवाची माहिती..

 • Always told economical details to your wife for better future

  लोन, क्रेडिट डिटेल
  कर्जाची रक्कम, ईएमआय आणि क्रेडिट कार्ड बिल अशा ठिकाणी ठेवायला हवे ज्याठिकाणाहून ते दोघांनाही सहज उपलब्ध होईल. एखाद्या आपत्कालीन परिस्थितीत पतीचा मृत्यू झाला तर पत्नी क्लेम करू शकते. 


   

 • Always told economical details to your wife for better future

  संपत्ती, मृत्यूपत्र 
  संपत्तीबाबतची सर्व कागदपत्रे अशा ठिकाणी ठेवायला हवी ज्याठिकाणी ते सुरक्षित राहतील. उदाहरणार्थ बँक लॉकर किंवा घर. या दस्तऐवजांबाबत दोन्ही पार्टनर्सना माहिती हवी. त्यामुळे एकाच्या अनुपस्थितीत दुसऱ्याला त्याचा वापर करता येऊ शकतो. 

Trending