आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पती अपयशी ठरत असताना विश्वचषकात पत्नीने रचला इतिहास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - 57 महिन्यांनंतर घरच्या मैदानावर खेळण्यासाठी उतरलेला ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क भारतीय संघासमोर अपयशी ठरतोय. पण त्याची पत्नी एलिसा हिलीने टी-20 वर्ल्डकपमध्ये आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे. ऑस्ट्रेलियाच्या या विजयामध्ये हिलीचे महत्वाचे योगदान होते.  

 

पती अपयशी पत्नीने रचला इतिहास
> 25 नोव्हेंबरला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तिसरा टी-20 सामना खेळला गेला. याच दिवशी टी-20 महिला विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा सामना होता. 

> एकिकडे भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. पण त्यांच्या महिला संघाने टी-20 वर्ल्डकपवर आपले नाव कोरले.

> कांगारूंना चॅम्पियन बनविण्यात विकेटकीपर फलंदाज एलिसाचे महत्वाचे योगदान होते. यामुळेच तिला 'वुमन ऑफ द टुर्नामेंट' घोषित करण्यात आले. या स्पर्धेत एलिसाने 5 सामन्यात दोन अर्धशतकेच्या जोरावर 56.23च्या सरासरीने 225 धावा काढल्या होत्या. इतकेच नाही एलिसाने 4 सामन्यांमध्ये 'वूमन ऑफ द मॅच'चा अवॉर्ड मिळवला. 


2015 च्या विश्वचषकात केला होता स्टार्कने कमाल

> सध्या मिशेल स्टार्कला लय गवसली नसली तरी 2015 च्या विश्वचषक स्पर्धेत त्याने मॅन ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार पटकावला होता. यासह एलिसा आणि मिशेल स्टार्क हे आयसीसी टूर्नामेंटमध्ये प्लेअर ऑफ द सिरीज पुरस्कार मिळवणारे क्रिकेट इतिहासातील पहिले दाम्पत्य आहे.


दोन वर्षांपूर्वी झाले विवाहबद्ध
> मिशेल आणि एलिसा यांची 2015 मध्ये भेट झाली होती. एका वर्षानंतर दोघांनीही 2016 मध्ये विवाह केला. एलिसा आणि मिचेल कसोटी क्रिकेट खेळणारे क्रिकेट इतिहासातील तिसरे दाम्पत्य आहे. याआधी इंग्लंडचे क्रिकेट जोडपे रॉजर आणि रूथ इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेट खेळले आहेत. तर श्रीलंकेच्या गुवे आणि रसंजली यांनीही पुरूष आणि महिला क्रिकेट संघाकडून कसोटी क्रिकेट खेळले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...