आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Amaayra Dastur Runs E rickshaw For 'Prasthanam' Movie, Trained By Local Driver In Lucknow

'प्रस्थानम' साठी अमायरा दस्तूरने चालवली ई-रिक्शा, लखनऊमध्ये लोकल ड्रॉयव्हरने दिले ट्रेनिंग

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : 'जजमेंटल है क्या' मध्ये राजकुमार रावसोबत दिसलेली अमायरा दस्तूर आता पुढे 'प्रस्थानम' या चित्रपटात यूनिव्हर्सिटी स्टुडंटच्या भूमिकेत दिसणार आहे. ती चित्रपटातील एका गाण्यामध्ये ई रिक्शा ड्रायव्हरच्या भूमिकेत डान्स करताना दिसणार आहे. यूपीमध्ये त्या गाडीला टुकटुक म्हणले जाते.  
 

 

रोमँटिक गाण्यामध्ये केला आहे प्रयोग... 
अमायराचा हा सीक्वेंस अली फजलसोबत रोमँटिक गाण्यासाठी चित्रित केला गेला आहे. अमायराने यापूर्वी कधीच कोणतीच गाडी चालवली नाही. यासाठी लखनऊमध्ये लोकल ड्रायव्हरकडून अमायराचे ट्रेनिंगदेखील करून घेतले होते. गाण्यामध्ये यूपीचा ताजमहाल, फतेहपुर सिकरी आणि ला मार्टिनियर कॉलेजदेखील बॅकड्रॉपमध्ये दिसणार आहे.
 

अमायराने सांगितले कसा होता अनुभव... 
अमायराने सांगितले की, तिच्यासाठी हा खूपच छान अनुभव होता. ती म्हणाली - 'फनी एक्सपीरियंस होता. ही गाडी चालवताना मजा आली. ही बऱ्यापैकी स्कूटीसारखी होती. मी माझ्या आधीच्या चित्रपटासाठी स्कूटी चालवायला शिकले होते. आता ही टुक-टुक मी 'प्रस्थानम' मध्ये चालवताना दिसणार आहे.' 

बातम्या आणखी आहेत...