आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमला सलग दुसऱ्यांदा ठरली मिस महाराष्ट्र

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा - जागतिक स्पर्धेतील चॅम्पियन  महेंद्र चव्हाण हा रविवारी यंदाच्या महाराष्ट्र श्री पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याने १६ व्या  महाराष्ट्र श्री राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेतील पुुरुष गटात हा किताब पटकावला. दुसरीकडे मुंबईची अमला ही सलग दुसऱ्यांदा महिलांच्या गटात मिस महाराष्ट्र किताबाची मानकरी ठरली. पुण्याच्या महेंद्र चव्हाणने किताबाच्या शर्यतीत मुंबईच्या अनिल बिलावाचे कडवे आव्हान संपुष्टात अाणले. यासह ताे विजेता ठरला.  मुंबईच्या अमला ब्रह्मचारीने महिलांच्या शरीरसौष्ठव गटात सलग दुसऱ्यांदा “मिस महाराष्ट्र’चा मान पटकावला. तसेच महिलांच्या मॉडेल फिजिक प्रकारात उपनगरची दीपाली ओगले “मिस महाराष्ट्र’ ठरली. महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे मुंबईच्या अमला ब्रह्मचारीचाच दबदबा दिसला. तिने शरीरसौष्ठव गटात सर्वोत्तम प्रदर्शन करताना मिस महाराष्ट्रचे जेतेपद कायम राखले. गतवर्षीही अमलाने हा किताब जिंकला होता. उत्कृष्ट प्रदर्शनाच्या बळावर मिस महाराष्ट्रचा निकाल बदलण्याची करामत करून दाखवली. मुंबई श्री स्पर्धेतील विजेत्या रेणुका मुदलियारवर मात करीत दीपालीने आपले जेतेपदाचे स्वप्न साकार केले. गेल्या वर्षी ती या स्पर्धेत उपविजेती ठरली होती. पुण्याची अदिती बंब तिसरी आली. या दोन्ही गटांत सहभागी झालेल्या सर्व महिला खेळाडूंची आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. 
>  सर्वोत्तम प्रगतीकारक खेळाडू : तौसिफ मोमीन ( पुणे)
> महाराष्ट्र श्री उपविजेता : अनिल बिलावा (मुंबई)
>  महाराष्ट्र श्री किताब विजेता : महेंद्र चव्हाण  (पुणे)बातम्या आणखी आहेत...