आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या नजरेत वाटते प्लॅस्टिक डॉल, ब्रेस्ट सर्जरी होती जीवावर बेतणारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : बार्बी डॉल किंवा कार्टून कॅरेक्टरसारखे दिसण्यासाठी जगभरातील मॉडेल्स काहीही करण्यास तयार असतात. याचे सर्वात मोठे उदाहरण नुकतेच फिनलँड येथे पाहायला मिळाले. 22 वर्षांच्या या वेबकॅम गर्लने लोकांना आकर्षित करण्यासाठी कित्येक प्लॅस्टिक सर्जरी करुन घेतल्या आहेत. ती तिच्या उद्देशात सफल झाली असून प्रथम दर्शनी लोक तिला डॉलच समजतात. वास्तविक वेबकॅम गर्ल बनण्यापूर्वी अमांडा एका हॉस्पिटलमध्ये क्लिनिंगचे काम करत होती.

 

ब्रेस्ट सर्जरी होती जीवावर बेतणारी.. 
- अमांडाला फार पूर्वीपासून बार्बी डॉलसारखे दिसण्याची हौस होती. तिची ही हौस एकदा तिच्या जीवावर बेतणारी ठरली होती. अमांडाने आतापर्यंत स्वतःच्या शरीरावर हजारो पाऊंड खर्च केले असूनही ती खूष नाही. तिला पूर्णपणे प्लॅस्टिक डॉलसारखे दिसायचे आहे. तिने आतापर्यंत कित्येक फेशियल सर्जरी आणि 3 ब्रेस्ट सर्जरी करुन घेतल्या आहेत. 
- अमांडाला तिसरी ब्रेस्ट सर्जरी अतिशय महागात पडणार होती. अमांडाने सांगितले, की ब्रेस्ट साइज वाढवण्यासाठी मी तिसरी सर्जरी करुन घेतली होती, यामुळे माझ्या मेंदूवर सूज आली होती. यातून मोठ्या मुश्किलीने माझा जीव वाचला होता. तेव्हा माझ्या आईलाही माहित नव्हते की मला काय होत आहे.

 

किती केला खर्च..  
- अमांडाने तिच्या संपूर्ण शरीरावर आतापर्यंत 19 हजार पाऊंड (जवळपास 17 लाख रुपये) खर्च केला आहे. यामध्ये ब्रेस्ट सर्जरीमध्येच तिने 12 लाख रुपये खर्च केले आहेत. याशिवाय नाकावर 3.5 लाख रुपये खर्च झाले.

 

का केले असे..  
- अमांडा म्हणते की या सर्जरीने मला काहीही फरक पडत नाही, मी तोपर्यंत प्लास्टिक सर्जरी करुन घेणार आहे, जोपर्यंत मी प्लॅस्टिकच्या बार्बी सारखी दिसत नाही. 
- अमांडाने सांगितले की ती लवकरच ब्राझिलियन बम लिफ्टसाठी सर्जरी करुन घेणार आहे.

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, आता कशी दिसते अमांडा..

 

बातम्या आणखी आहेत...