Home | National | Other State | Amar Singh Can Announce New Party With Rebels Leaders of SP

सपाच्या बंडखोरांसह नवीन पक्ष स्थापन करू शकतात अमर सिंह, सपा-बसपाला रोकण्यासाठी भाजप करणार मदत

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 05, 2018, 10:46 AM IST

अमरसिंहांच्या या कल्पनेला भाजपचीही साथ मिळाली आहे. शहा यांनी आठवडाभरापूर्वी सपाच्या या नेत्याची गोपनीय भेट घेतली होती.

 • Amar Singh Can Announce New Party With Rebels Leaders of SP

  लखनऊ - अमर सिंह उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीच्या एका मोठ्या नेत्याच्या साथीने नवीन पक्ष स्थापन करण्याच्या विचारात आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार नवीन पार्टी स्थापन करण्याचा उद्देश 2019 च्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीच्या मतदारांना आपल्याकडे आकर्षित करणे हा आहे. अमर सिंह यांच्या या कल्पनेला भाजपचीही साथ मिळाली आहे. अमित शहा यांनी आठवडाभरापूर्वी हरियाणा सपाच्या या नेत्याची गोपनीय भेट घेतल्याची चर्चा आहे.


  लखनऊ दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेमध्ये टीका करताना अमर सिंह यांचा उल्लेख केला होता. मोदी म्हणाले होते, ज्यांचा हेतू शुद्ध नाही ते पडद्यामागे उद्योजकांना भेटतात. अमरसिंहकडे त्या सर्वांची हिस्ट्री आहे. अमरसिंह म्हणाले होते, मी मोदींचा प्रशंसक असून उर्वरीत जीवन त्यांच्याच नावे समर्पित आहे. पण भाजपमध्ये जाण्याबाबत सध्या काही नक्की नसल्याचेही ते म्हणाले.


  या महिन्यात पक्षाच्या घोषणेची शक्यता
  सुत्रांच्या मते, नवीन पक्षाचे नाव ठरले आहे. त्याशिवाय पदाधिकाऱ्यांची निवडही झाली आहे. 15 ऑगस्टनंतर कधीही या पक्षाची घोषणा होऊ शकते. सपा नेते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याकडून फार महत्त्व दिले जात नसल्याने नाराज आहेत. नुकतेच ते समाजवादी पार्टीच्या कार्यकारिणी बैठकीतही पोहोतले नव्हते.


  पश्चिमी युपीवर लक्ष
  सूत्रांच्या मते नव्या पार्टीचा फोकस पश्चिम युपीवर असेल. लोकसभा निवडणुकीत हा नवा पक्ष काही उमेदवार मैदानात उतरवू शकतो. त्यांच्या समर्थनाने भाजपचे उमेदवारही मैदानात उतरतील. त्यात सपा आणि बसपा दोघांचेही नुकसान होऊ शकते.


  ठाकूर आणि यादव मते गमावण्याची शक्यता
  अखिलेश आणि मायावती एकत्र आल्याने राजा भैय्यानेही सपापासून दुरावा केला आहे. आता अमर सिंहही नव्या पक्षाच्या माध्यमातून निवडणुकीत उतरले तर ठाकूर मते बसपा आणि सपापासून दूर दाऊ शकतात. त्यात सपाचे नाराज नेते यादव मतांची विभागणी करू शकतात. त्यामुळे आघाडीला फटका बसू शकेल. सपा-बसपापासून दूर गेलेल्या मतांचा फायदा भाजपलाही मिळू शकतो. उत्तर प्रदेशात 9 टक्के यादव मतदार आहेत. त्यांचा 10 लोकसभा जागांवर प्रभाव आहे. तर 7 टक्के ठाकुर मतदारांचा प्रभाव 15 जागांवर आहे.

Trending