आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amar Singh & Jayaprada News In Marathi, UP, LokSabha

अमरसिंह, जयप्रदा राष्ट्रीय लोकदलमध्ये, उत्तर प्रदेशात नवीन समिकरणांची नांदी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ- समाजवादी पक्षाचे माजी नेते अमरसिंह आणि जयाप्रदा यांनी आज (सोमवार) राष्ट्रीय लोकदलात प्रवेश केला आहे. मी राष्ट्रीय लोकदलात जाणार आहे, असे खुद्द अमरसिंह यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते.
यासंदर्भात अमरसिंह यांनी सांगितले, की जयाप्रदा बिजनौर येथून तर मी फतेहपूर सिकरी येथून निवडणूक रिंगणात उतरणार आहे. उत्तर प्रदेशचे विभाजन केल्याशिवाय विकास साधता येणार नाही. भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह यांच्यासोबत माझे वैचारिक मतभेद असले तरी ते माझे चांगले मित्र आहेत. याला राजकीय गॅंगवॉर म्हणता येईल.
अमरसिंह आणि जयाप्रदा कॉंग्रेसमध्ये जाणार असल्याची काही दिवसांपूर्वी चर्चा होती. परंतु, कॉंग्रेसमध्ये केवळ जयाप्रदा यांना प्रवेश मिळणार होता. अमरसिंह यांच्यासाठी कॉंग्रेसची दारे बंद होती. त्यामुळे दोघांनी कॉंग्रेसला दूर करून रालोदला जवळ केले आहे.
समाजवादी पक्षातून बाहेर पडल्यावर अमरसिंह यांनी राष्ट्रीय लोकमंच पार्टीची स्थापना केली होती. परंतु, त्यांच्या या पार्टीला म्हणावे तसे यश मिळविता आले नाही.
पुढील स्लाईडवर वाचा, उत्तर प्रदेशात रालोद आणि कॉंग्रेसमध्ये आघाडी