आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Amarnath Yatra Begins In Tight Security; Governor Malik Participated In First Worship

कडक सुरक्षा व्यवस्थेत अमरनाथ यात्रा झाली सुरू; राज्यपाल मलिक यांनी ‘प्रथम पूजे’त घेतला सहभाग

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर/जम्मू - वार्षिक अमरनाथ यात्रा सोमवारी कडक सुरक्षा व्यवस्थेत सुरू झाली. राज्यपाल सत्यपाल मलिक ‘प्रथम पूजे’त सहभागी झाले आणि त्यांनी राज्यात शांतता कायम राहावी, अशी प्रार्थना केली. ४६ दिवसांची ही यात्रा १५ ऑगस्टला संपणार आहे.

 

श्री अमरनाथ देवस्थान मंडळाच्या प्रवक्त्याने सांगितले की, यात्रेकरूंची पहिली तुकडी सोमवारी बेस कॅम्पपासून पवित्र गुहेकडे रवाना झाली आणि त्याबरोबरच अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली. संबंधित जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पहलगाम आणि बालटाल बेस कॅम्पपासून यात्रेला हिरवी झेंडी दाखवली. यात्रेच्या पहिल्या तुकडीतील २ हजार २३४ भाविक नुनवान-पहलगाम आणि बालटाल येथील बेस कॅम्पमध्ये रविवारी दाखल झाले होते. अधिकाऱ्यांनी सांगितले की, यात्रा मार्गावर ठिकठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. भाविकांवर आणि वाहनांवर उपग्रहाच्या आणि चिप-आधारित ट्रॅकिंग यंत्रणेद्वारे लक्ष ठेवले जाईल. आतापर्यंत देशभरातील १.५ लाख भाविकांनी या यात्रेसाठी नोंदणी केली आहे.
 

राज्यपालांनी घेतले दर्शन 
राज्यपाल हे श्री अमरनाथ देवस्थान मंडळाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी अमरनाथचे दर्शन घेतले आणि ‘प्रथम पूजे’त सहभागी झाले. त्यांच्यासोबत मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमंग नरुला हेही होते. राज्यपालांनी भाविकांसाठी देण्यात आलेल्या सुविधांचा आढावा घेतला तसेच लष्कर, केंद्रीय सशस्त्र दले, राज्य पोलिस आणि इतर संबंधित संस्थांचे त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.