Home | Jeevan Mantra | Dharm | amawasya on 6th december how to take bath according to mythology

घरातच स्नान करताना पाण्यात गंगाजल टाकून करावा या 1 मंत्राचा उच्चार, मिळेल नदी स्नानाचे पुण्य

रिलिजन डेस्क | Update - Dec 06, 2018, 12:02 AM IST

गुरुवार 6 डिसेंबरला अमावास्या, या तिथीला पवित्र नदीमध्ये स्नान करण्याची प्रथा, जे लोक नदीमध्ये स्नान करू शकत नाहीत त्यां

 • amawasya on 6th december how to take bath according to mythology

  गुरुवार, 6 डिसेंबरला कार्तिक मासातील अमावास्या आहे. प्राचीन काळापासून या खातील पवित्र नदीमध्ये स्नान करण्याची प्रथा चालत आलेली आहे. याच कारणामुळे अमावास्येला देशभरातील नद्यांमध्ये स्नान करण्यासाठी भक्त मोठ्या संख्येने पोहोचतात. अनेक लोकांना या दिवशी नदीमध्ये स्नान करण्याची इच्छा असते परंतु हे पुण्य कर्म ते करू शकत नाहीत. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार अशा लोकांसाठीही शास्त्रामध्ये स्नानाचा एक विधी सांगण्यात आला आहे. या विधीनुसार घरीच नदी स्नानाचे पुण्य प्राप्त करू शकता.


  स्नान करण्याच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल मिसळावे
  ज्या लोकांना नदीमध्ये स्नान करणे शक्य नसेल त्यांनी पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करावे. यासोबतच स्नान करताना स्नान मंत्राचा उच्चार करावा...


  मंत्र : गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती।
  नर्मदे सिन्धु कावेरी जले अस्मिन् सन्निधिम् कुरु॥


  स्नान करताना या मंत्राचा उच्चार केल्यास तीर्थ स्नानाचे पुण्य मिळते. या मंत्रामध्ये सात पवित्र नद्यांची नवे आहेत. स्नान करताना या मंत्राचा जप करणे शुभ मानले जाते.


  या मंत्राचाही करू शकता उच्चार
  मान्यतेनुसार त्रिदेव म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिन्ही देवतांना गंगा विशेष प्रिय आहे. या तिन्ही देवांची तसेच गंगा देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी खालील मंत्राचा उच्चार करावा..


  मंत्र : ब्रह्मकुंडली, विष्णुपादोदकी, जटाशंकरी, भागीरथी, जाह्नवी।


  अमावास्येला यापैकी कोणत्याही एका मंत्राचा उच्चार करू शकता. मंत्र जपाची संख्या कमीत कमी 11, 21 किंवा 108 असावी.

Trending