Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | Amazing Benefits Of Cardamom

रात्री 2 विलायची खाऊन प्या 1 ग्लास गरम पाणी आणि मग पाहा कमाल

हेल्थ डेस्क | Update - Aug 23, 2018, 10:57 AM IST

विलायची एक सुगंधीत मसाला आहे. गोड पदार्थांची चव वाढवण्यासाठी विलायचीचा वापर केला जातो.

 • Amazing Benefits Of Cardamom

  विलायची एक सुगंधीत मसाला आहे. गोड पदार्थांची चव वाढवण्यासाठी विलायचीचा वापर केला जातो. विलायचीचा वापर माउथ फ्रेशनरच्या रुपात देखील केला जाऊ शकतो. परंतु विलायचीचे केवळ एवढेच फायदे नाहीत. जर तुम्ही विलायची खाऊन त्यावर गरम पाणी प्यायल्यास तुम्हाला याचे दुप्पट फायदे होऊ शकतात. येथे जाणून घ्या, रात्री विलायची खाऊन गरम पाणी पिल्यास कोणकोणते फायदे होतात.


  आयुर्वेदिक एक्सपर्ट अबरार मुल्तानी यांच्यानुसार विलायचीचे विविध आरोग्य फायदे आहेत. छोटी विलायची कफ, खोकला, अस्थमा, मूळव्याध, हृदय आणि गळ्यातील जळजळ दूर करते. हृदय मजबूत बनवते. मळमळ थांबते. रात्री झोपण्यापूर्वी 2 विलायची गरम पाण्यासोबत घेतल्याने शरीराला खास फायदे होतात.


  पोट जाईल आत
  तुमचे पोट बाहेर आले असेल आणि तुम्हला स्लिम बॉडी हवी असल्यास रात्री 2 विलायची खाऊन गरम पाणी प्यावे. यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन B1, B6 आणि व्हिटॅमिन C असते. हे शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करतात. यामधील फायबर आणि कॅल्शियम वजन कंट्रोल करण्यातही मदत करतात. यामुळे विलायची खाऊन गरम पाणी पिण्यास विसरू नका.


  केस गळणार नाहीत
  रात्री 2 विलायची खाऊन पाणी पिल्याने केस मजबूत होतात. केस गळणारही नाहीत आणि काळे होतील. यामुळे केसातील कोंडा (डँड्रफ)ही दूर होईल.


  स्पर्म काउंट वाढेल
  तुमचा स्पर्म काउंट कमी असेल तर हा उपाय रामबाण ठरेल. विलायची खाऊन गरम पाणी पिल्याने स्पर्म काउंट वाढण्यास मदत होते.

 • Amazing Benefits Of Cardamom

  रक्त प्रवाह सुरळीत होईल
  तुम्ही दोन विलायची खाऊन एक ग्लास गरम पाणी प्यायल्यास शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहतो तसेच रक्तही शुद्ध होते. यामुळे तुमची स्किनही चांगली राहते.

 • Amazing Benefits Of Cardamom

  पचनक्रिया सुरळीत करते
  विलायची नैसर्गिकरित्या गॅसला नष्ट करण्याचे काम करते. विलायची पचनशक्ती वाढवण्यात, पोटाची सूज कमी करण्यात आणि छातितील जळजळ संपवण्याचे काम करते. आयुर्वेदिक ग्रंथांप्रमाणे विलायची पचनक्रियेत मदत करते.

Trending