आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भीम नाही तर धृतराष्ट्र होते खरे महाबली, दुर्योधनाच्या मृत्यूनंतर घडला होता हा प्रकार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेकांना वाटते की, महाभारतात भीम हाच सर्वात शक्‍तीशाली बाहुबली आहे. मात्र महाभारतामध्‍ये भीमपेक्षाही अधिक शक्‍ती असणारे एक पात्र आहे. ती व्‍यक्‍ती आहे दुर्योधनाचे वडील धृतराष्‍ट्र. ते अंध होते मात्र खूप शक्‍तीशाली होते. महाभारतानूसार धृतराष्‍ट्रामध्‍ये दहा हजार हत्‍तींचे बळ होते. म्‍हणजेच त्‍यांच्‍यामध्‍ये भीमपेक्षाही जास्‍त शक्‍ती होती.


> युद्धामध्‍ये पांडवांनी दुर्योधन आणि पूर्ण कौरव सेनेचा अंत केला होता. यामुळे धृतराष्ट्र अतिशय दु:खी झाले होते. 


> महाभारताच्‍या युद्धामध्‍ये भीमाने धृतराष्‍ट्राचे प्रिय पुत्र दुर्योधन आणि दु:शासनाचा अतिशय निर्घुणतेने वध केला होता. याकारणामुळे धृतराष्‍ट्र अतिशय दु:खी झाले होते आणि त्‍यांना भीमाला मारायचे होते.


> युद्ध समाप्‍त झाल्‍यानंतर श्रीकृष्‍ण युधिष्‍ठीर, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव यांच्‍यासह महाराज धृतराष्‍ट्रांना भेटायला गेले होते.


> सर्वप्रथम युधिष्‍ठरने धृतराष्‍ट्रला प्रणाम केला. त्‍यानंतर सर्व पांडवांनी आपापले नाव सांगून धृतराष्‍ट्राला प्रणाम केला.


> नंतर धृतराष्‍ट्रने भीमशी गळाभेट घेण्‍याची इच्‍छा व्यक्‍त केली. मात्र श्रीकृष्णाला धृतराष्‍ट्राच्‍या मनाचा हेतू समजला आणि ताबडतोब भीमऐवजी एक लोखंडाची मुर्ती त्यांनी समोर केली.


> धृतराष्‍ट्र ऐवढे शक्‍तीशाली होते की, संतापात त्‍यांनी त्‍या मुर्तीला एवढी घट्ट मिठी मारली की, सर्व मुर्तीचे क्षणात तुकडेतुकडे झाले. यादरम्‍यान त्‍यांच्‍या बाहुतून रक्‍तही आले व नंतर ते जमिनीवर कोसळले.


> थोड्याच वेळाने त्‍यांचा राग शांत झाला. त्‍यांना वाटले की आपण भीमला आपण मारुन टाकले आणि ते रडू लागले.


> तेव्‍हा श्रीकृष्णाने धृतराष्‍ट्रांना सांगितले की, तुम्‍ही ज्‍याचे तुकडे केले ती एक मुर्ती होती. भीम अजुनही जिवंत आहे. अशा प्रकारे श्रीकृष्‍णाने भीमचा जीव वाचवला.