आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Good News: आता पेट्रोलची चिंता संपली, पाण्यावर धावणार ही भारतीय कार, मायलेज 300 किमी प्रति लीटर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (IIT) रुरकीच्या विद्यार्थ्यांच्या एका अविष्काराने अशक्याला शक्य करून दाखवले. पाण्यावर धावणारी कार तयार करून विद्यार्थ्यांनी स्वप्नाला सत्यात उतरवण्याची कामगिरी केली आहे. ही कार स्वस्त इंधनावर तर चालेलच, पण पर्यावरणावरही सकारात्मक परिणाम टाकेल. 

 

एक लिटर पाण्यावर चालणार 300 किमी 

ही कार पाणी आणि अॅल्युमिनियम प्लेटच्या मदतीने चालवता येईल. ही एकदा चार्ज करून एक हजार किमीपर्यंत चालवता येऊ शकेल. दुसरीकडे, यापेक्षा जास्त अंतर कापण्यासाठी अॅल्युमिनियम प्लेटला दुसऱ्यांदा चार्ज करावे लागेल. या चार्जिंग पूर्ण प्रक्रियेत 15 मिनिटांचाच अवधी लागेल. कारला पर्याप्त ऊर्जा देण्यासाठी दर 300 किमी अंतरावर एक लीटर पाण्याची आवश्यकता असेल. म्हणजेच एक लीटर पाण्यावर ही कार 300 किमी प्रति लीटरचे मायलेज देईल. कारमध्ये लागणारी अॅल्युमिनियम प्लेटची किंमत 5 हजार रुपये असेल. परंतु भविष्यात मागणी वाढल्यास याच्या उत्पादन खर्चात कमी होण्याची शक्यता कमी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

 

पुढच्या स्लाइडवर वाचा- कारची सध्या सुरू आहे टेस्टिंग 

 

बातम्या आणखी आहेत...