आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Amazing: Mandsaur Is King Ravanas In Laws Village 35 Feet Statue Worshiped By People

भारतातील या गावचा जावई होता महाबली रावण, 35 फुटी मूर्तीची लोक करतात मनोभावे पूजा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - एमपीच्या मंदसौरमध्ये रावणाबद्दल वेगवेगळ्या मान्यता आणि परंपरा आहेत. येथील छीपा समाजाचे लोक रावणाला त्यांचा जावई मानतात. येथील खानपुरामध्ये रावणाची 35 फुटी उंच मूर्ती आहे. समाजाच्या लोकांची मान्यता आहे की, रावणाच्या पायांवर लच्छा (धागा) बांधल्याने ताप दूर होतो. येथे दसऱ्याच्या दिवशी अगोदर रावणाची पूजा केली जाते आणि मग त्याची अनुमती घेऊन त्याचा सांकेतिक वध केला जातो.

 

- खानपुरामध्ये रावणाची प्राचीन मूर्ती तब्बल 35 फूट उंच आहे. असे सांगतात की, ही मूर्ती 500 वर्षे जुनी आहे. अगोदर येथे चुना आणि दगडांनी बनलेली मूर्ती होती. यानंतर नगरपालिकेने सिमेंट काँक्रीटची मूर्ती बनवली.


- रावणाला 10 शिर होते, यामुळे त्याला दशानन म्हटले जायचे, परंतु या मूर्तीत रावणाला 9 शिर आहेत, मूर्तीच्या दोन्ही बाजूंनी 4-4 मुख आहेत. प्रमुख मुखाच्या वर दहावे शिर म्हणून गाढवाचे तोंड बनवण्यात आले आहे.


जावयासमोर महिला घेतात घुंघट
- अशी आख्यायिका आहे की, रावणाची पत्नी मंदोदरी मंदसौरची कन्या होती. नामदेव छीपा समाजाचे लोक स्वत:ला त्याचे वंशज मानतात. समाजातील महिला आजही रावणाच्या मूर्तीसमोर घुंघट घेतात. दसऱ्याच्या दिवशी समाजाचे लोक या मंदिरात एकत्र होतात.


करतात सांकेतिक वध...
- दसऱ्याच्या दिवशी सर्व जण खानपुराच्या एका मंदिरात एकत्र होतात. मंदिरातून श्रीरामाचे सैन्य बनून लोक रावण मूर्तीच्या स्थळावर पोहोचतात. मूर्तीची पूजा करून सुख-समृद्धी कामना केली जाते.
- यानंतर समाजाचे लोक रावणाची प्रार्थना करतात की, तुम्ही आमचे जावई आहात, परंतु तुम्ही सीताहरणाचा अपराध केला म्हणून श्रीरामाचे सैन्य तुमचा वध करायला आले आहे. कृपया याची परवानगी द्या.
- गोधुली बेला होताच मूर्ती स्थळावर काही काळ अंधार केला जातो. यानंतर उजेड करून रावण वधाची घोषणा केली जाते आणि मग श्रीरामाच्या विजयाचा उत्सव साजरा करून लोक घराकडे वळतात.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, संबंधित आणखी फोटोज... 

 

बातम्या आणखी आहेत...