आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामॉस्को - रशियाच्या व्लादिमीर शहरात सध्या इव्हान सुखोवची कहाणी चर्चेचा विषय ठरली आहे. वास्तविक, इव्हान आपल्या 3 पत्नींसोबत राहतो. त्याच्या मते, त्याने पत्नींना शिक्षा देण्याची सर्वात चांगली पद्धत शोधून काढली आहे. जेव्हाही त्याचे तिन्हीपैकी एखाद्या पत्नीशी मतभेद होतात किंवा नाराज होतो, तेव्हा तो तिच्यासोबत सेक्स करणे बंद करून टाकतो आणि एका महिन्यासाठी तिला बेडरूममध्ये प्रवेश देत नाही.
असे आहे पूर्ण प्रकरण...
- 34 वर्षीय इव्हान सुखोव तीन पत्नींसोबत राहतो. अशा प्रकारच्या रिलेशनशिपला पॉलीगेमी म्हटले जाते. तथापि, रशियाच्या कायद्यानुसार तेथे फक्त एकच अधिकृत पत्नी असू शकते. परंतु आणखी दोन पार्टनर हे म्युच्युअल अॅग्रीमेंटने ठेवले जाऊ शकतात.
- पॉलिगेमिस्ट बनण्याआधी इव्हान 11 वर्षांपासून फक्त त्याची पत्नी नतालिया सुखोवसोबत राहत होता. परंतु इव्हानचे स्वप्न मात्र पुष्कळ बायका आणि 50 मुलांचे होते.
मग पत्नीनेच केली मदत
- एका स्थानिक रुग्णालयात नर्स म्हणून राहत असलेली इव्हानची पत्नी नतालिया म्हणाली की, आधी ती या कल्पनेच्या विरुद्ध होती. परंतु नंतर तिने आपला विचार बदलला आणि आपल्या पतीला असे करण्याची परवानगी दिली. सध्या इव्हानला 9 मुले आहेत.
- 6 मुले नतालिया आणि 3 दुसरी पार्टनर एनाचे आहेत. एना प्रेग्नंट आहे आणि 10व्या मुलाची तयारी करत आहे. इव्हानला भविष्यात तब्बल 50 मुले जन्माला घालायची इच्छा आहे.
- इव्हानची तिसरी पत्नी मदिना मुस्लिम आहे आणि नुकतेच तिने इव्हानच्या कुटुंबात पाऊल ठेवले आहे. तथापि, मदिनाचे आईवडील हे धर्मामुळे या नात्याच्या विरोधात होते. परंतु मुलीच्या हट्टापुढे त्यांनी हात टेकले.
आता घर पडतेय अपुरे
- इव्हान आपल्या तिन्ही पार्टनरसोबत एका 3 बीएचके फ्लॅटमध्ये राहतो. परंतु भविष्यात तो शहराबाहेर एक मोठे घर खरेदी करू इच्छितो.
- सुखोवची स्वत:ची एक वेगळी रूम आहे. यात तो ठरवतो की, आज कोणत्या पत्नीसोबत रात्र घालवायची आहे. नतालियाने सांगितले की, बहुतांश वेळा सर्वांचा नंबर आळीपाळीने येतो.
- अनेकदा तर असे होते की, त्याचा एखाद्या पत्नीवर राग असेल तर तो त्यांना एक महिनाभर बेडरूममध्ये प्रवेश देत नाही. यादरम्यान त्या त्याच्या रूममध्ये शिरू शकत नाहीत.
- सुखोव आणि त्याच्या सर्व पत्नी जॉब करतात. यामुळे घरात पुष्कळ पैसे येतात. कुटुंबाच्या मते, ते आपल्या मुलांना उत्तम सुखसुविधा देत आहेत.
पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी Photos...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.