आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सणाआधी अॅमेझाॅन व फ्लिपकार्टची १.४ लाख लाेकांना तात्पुरती नाेकरी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ई-काॅमर्स क्षेत्रातील सर्वात माेठी कंपनी अॅमेझाॅन आणि फ्लिपकार्टने सणासुदीचे दिवस सुरू हाेण्याआधी आपल्या नेटवर्कमध्ये जवळपास १.४ लाख लाेकांना तात्पुरत्या स्वरूपात नाेकरी दिली आहे. दाेन्ही कंपन्या या महिनाअखेरीस आपला सणाचा हंगाम सुरू करत आहेत. दाेन्ही कंपन्या सप्लाय चेन, लास्ट माइल कनेक्टिव्हिटी आणि कस्टमर सपाेर्ट सेगमेंटमध्ये या भरती केल्या आहेत. अॅमेझाॅनने जारी केलेल्या एका पत्रकानुसार, कंपनीने आपल्या फुलफिलमेंट सेंटर्स, साॅर्टेशन सेंटर्स, डिलिव्हरी स्टेशन, पार्टनर फुलफिलमेंट नेटवर्क आणि कस्टमर सर्व्हिस साइट्सवर ९० हजार हंगामी राेजगारच्या संधी निर्माण केल्या आहेत. याच पद्धतीने फ्लिपकार्टने सांगितले की, त्यांनी सप्लाय चेन, लाॅजिस्टिक आणि कस्टमर सपाेर्टमध्ये ५०,००० हून जास्त लाेकांना सामावून घेतले आहे. फ्लिपकार्टने एका पत्रकात नमूद केले की, बिग बिलियन डेज सेलआधी कंपनीने सेलर नेटवर्कद्वारे गेल्या वर्षीच्या तुलनेत अप्रत्यक्ष नाेकऱ्यांत ३०% ची वाढ नाेंदवली आहे. आत याद्वारे जाेडलेल्या लाेकांची संख्या वाढून ६.५ लाखांवर पाेहाेचली आहे. आॅफलाइन रिटेलप्रमाणे दसरा आणि दिवाळीदरम्यान ई-काॅमर्स कंपन्यांची विक्रीत माेठी वाढ पाहावयास मिळते. सप्टेंबर ते नाेव्हेंबरदरम्यानचा काळ कंपन्यांसाठी वार्षिक विक्रीत माेठा वाटा असताे. 
 

गेल्या वर्षीच्या तुलनेत सणासुदीत दुपटीहून जास्त वृद्धी
अॅमेझाॅनने सांगितले की, कंपनीने मुंबई, दिल्ली, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू, अहमदाबाद आणि पुण्यातील लाेकांना जाेडले आहे. यासाेबत कंपनीने फुलफिलमेंट सेंटर्समध्ये ट्रकिंग भागीदार आणि व्हेंडर्सच्या माध्यमातून लाेकांना अप्रत्यक्ष पद्धतीने राेजगार िदला आहे. अॅमेझाॅन इंडियाचे उपाध्यक्ष(कस्टमर फुलफिलमेंट) अखिल सक्सेना म्हणाले, कंपनीला चांगल्या कस्टमर सपाेर्टसाेबत वेगात डिलिव्हरी करण्यास मदत मिळेल.

अमेझाॅनजवळ ७५ शहरांत १४०० डिलिव्हरी सेंटर आहेत
अमेरिकेची ई-काॅमर्स कंपनी अॅमेझाॅनकडे ११ शहरांत १५ ग्राहक सेवा साइट्स आहेत, या आॅर्डरआधी व नंतर मदत पुरवते. कंपनीनडिलिव्हर सेवा पार्टनर नेटवर्क दुप्पट केले आहे. कंपनीकडे ७५० शहरांत १४०० डिलिव्हरी सेंटर आहेत. ग्राहकांना कस्टमर सपाेर्ट ई-मेल, चॅट, साेशल मीडिया ,फाेन काॅलच्या रूपात मिळताे. अॅमेझाॅन कन्नड, इंग्रजी, हिंदी, तामिळ व तेलगू भाषांमध्ये सेवा प्रदान करते.

राेजगार आणि विक्री वाढल्याने अर्थव्यवस्थेला मदत मिळेल
फ्लिपकार्टच्या म्हणण्यानुसार, त्यांनी सप्लाय चेनशी संबंधित क्षेत्र उदा. हँड हेल्ड डिव्हाइस, पीआेएस मशीन, स्कॅनर्स, माेबाइल अॅप्लिकेशन आणि ईआरपीसाेबत कस्टमर सेवा, डिलिव्हरी आणि इंन्स्टाॅलेशनमध्ये प्रशिक्षण व राेजगारच्या संधी दिल्या आहेत. फ्लिपकार्टचा उद्देश पूर्ण इकाेसिस्टिमला लाभ पाेहाेचवणे असल्याचे फ्लिपकार्ट ग्रुपचे सीईआे कृष्णमूर्ती यांनी सांगितले.