आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅमेझॉन व समारा कॅपिटल ४२०० कोटी रुपयांत खरेदी करणार रिटेल चेन मोर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- खासगी इक्विटी फंड समारा कॅपिटल व ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन आदित्य बिर्ला समूहाची रिटेल चेन मोर खरेदी करणार आहेत. या व्यवहारात मोरचे मूल्य ४,२०० कोटी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. रिलायन्स रिटेल, बिग बाजार व डीमार्टनंतर मोर देशातील चौथी सर्वांत मोठी सुपरमार्केट चेन आहे. देशात मोर ब्रँडचे ५०९ सुपरमार्केट व २० हायपरमार्केट आहेत. त्याची मालकी आदित्य बिर्ला रिटेल लिमिटेड(एबीआरएल)कडे आहे. या व्यवहारास स्पर्धा आयोगाची मंजुरी मिळणे आवश्यक आहे. मोरचा व्यवस्थापन चमू बदलणार नाही. 


समारा कॅपिटलने मोर खरेदी करण्यासाठी आदित्य बिर्ला रिटेलसोबत जूनमध्ये करार केला होता. त्यानंतर दुसऱ्या गुंतवणूकदाराच्या धर्तीवर अॅमेझॉन व गोल्डमन साक्ससोबत चर्चा करत आहे. गेल्या काही दिवसांत गोल्डमन या व्यवहारातून बाहेर पडली. अॅमेझॉन किराणा व अन्नपदार्थ व्यवसायात जम बसवू इच्छिते. मोरमुळे त्यांना मदत मिळेल. सध्या हे प्राइम नाऊ नावाने या व्यवसायात आहेत. मात्र, त्यांचे स्टोअर्स मुंबई, एनसीआर हैदराबाद व बंगळुरूपर्यंत मर्यादित आहेत. 


मोरमध्ये समारा कॅपिटल ५१% व अॅमेझॉन ४९% भागीदारी घेईल. समारा ही गुंतवणूक अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंडद्वारे करेल. या फंडमध्ये विदेशी गुंतवणूकदारांचा पैसा आहे. मात्र, व्यवस्थापन भारतीयांच्या हाती असल्याने ती भारतीयच मानली जाईल. नियमानुसार, मल्टिब्रँड रिटेलमध्ये ५१% थेट विदेशी गुंतवणुकीस (एफडीआय) परवानगी आहे. होलसेल व सिंगल ब्रँडमध्ये १००% एफडीआय केले जाऊ शकते. 


दोन वर्षांनंतर ७७ लाख कोटींची होईल किरकोळ विक्री बाजारपेठ 
४७ लाख कोटी रुपयांचा आहे भारतातील रिटेल बाजारपेठ 
७७ लाख कोटी रुपयांचा होईल २०२० मध्ये 
२०% वार्षिक वाढीची आशा सुपरमार्केटच्या विक्रीत (स्रोत : असोचेम) 


दरवर्षी १००-१५० स्टोअर उघडण्याची योजना 
दरवर्षी १००-१५० स्टोअर सुरू करण्याची समारा व अॅमेझॉनची योजना आहे. या वर्षी ९० स्टोअर सुरू करण्याची योजना आहे. आदित्य बिर्ला रिटेलवर मार्च २०१८ मध्ये ४००० कोटी कर्ज होते. कर्जामुळे मोरचा विस्तार होत नव्हता. 


ऑफलाइन रिटेलमध्ये दुसरी गुुंतवणूक 
भारतात ऑफलाइन रिटेल बाजारात अॅमेझॉनची ही दुसरी गुंतवणूक असेल. सप्टेंबर २०१७ मध्ये त्यांनी शॉपर्स स्टॉपमध्ये १८० कोटी देऊन ५% भागीदारी खरेदी केली होती. ते स्पेन्सर्स रिटेलमध्येही भागीदारी खरेदी करू इच्छित होते, मात्र जमले नाही. 

बातम्या आणखी आहेत...