International Special / अशी दिसते इतिहासातील सर्वात धनाढ्य व्यक्तीची न्यू गर्लफ्रेंड, विंबलडनदरम्यान प्रथमच दिसले एकत्रित


हिच्यासाठीच मोडला 25 वर्षांचा संसार, लवकरच करणार दुसरे लग्न
 

दिव्य मराठी वेब

Jul 16,2019 05:49:00 PM IST

लंडन- अॅमेझॉनचे फाउंडर आणि सीईओ जेफ बेजोस रविवारी गर्लफ्रेंड लॉरेन सांचेजसोबत विंबलडन टेनिसचा मेन्स सिंगल्स फायनल पाहण्यासाठी आले होते. नात्याची कबुली दिल्यानंतर बेजोस आणि सांचेज पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या समोर आले. विंबलडन टूर्नामेंटचा फायनल सामना रॉजर फेडरर आणि नोवाक योकोविकदरम्यान 5 तास चालला.


बेजोस यांनी 18 वर्षांपूर्वी बिल गेट्ससोबत टेनिस खेळले होते
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जेफ बेजोस टेनिसचे मोठे फॅन आहेत. 2001 त्यांनी पीट सेम्प्राससोबत मिळून पार्टनरशिपमध्ये एक चॅरिटी मॅच खेळला आहे. त्यांचा सामना बिल गेट्स आणि आंद्रे आगासीसोबत झाला होता.


बेजोस आणि सांचेज यांच्या नात्याचा खुलासा यावर्षीच जानेवारीत झाला. त्याआधीच बेजोस यांनी आपली पत्नी मॅकेंजी घटस्फोट दिला आहे. घटस्फोटाची संपूर्ण प्रकिया पूर्ण झाली आहे आणि सेटलमेंट अंतर्गत मॅकेंजीला अॅमेझॉनचे 4% शेअर मिळाले. याची सध्याची व्हॅल्यू 40.5 अब्ज डॉलर (2.77 लाख कोटी रुपये) आहे. पण तिने मिळाल्या संपत्तीपैकी अर्धी संपती दान करण्याची घोषणा केली आहे.


बेजोस आणि मॅकेंजी घटस्फोट झाला, त्याच्या दुसऱ्याच दिवशी लॉरेन सांचेजनेही घटस्फोटाचा अर्ज दाखल केला. माजी टीव्ही अँकर सांचेजने 14 वर्षांपूर्वी पॅट्रिक वायटसेलसोबत लग्न केले होते. वायटसेल हॉलीवूड एजंसी डब्ल्यूएमईचे सीईओ आहेत.

X
COMMENT