आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटस्फोट घेतोय पृथ्वीतलावरील सर्वात धनाढ्य व्यक्ती, पत्नीला 4.76 लाख कोटी मिळण्याची शक्यता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - केवळ जगातील नव्हे, तर इतिहासातील सर्वाथ धनाढ्य व्यक्ती म्हणून प्रसिद्ध असलेले अॅमेझॉन डॉटकॉमचे जेफ बेझोस घटस्फोट घेत आहेत. लग्नाच्या 25 वर्षांनंतर त्यांनी आपल्या पत्नीला घटस्फोट देत असल्याची घोषणा सोशल मीडियावर केली. गेल्या अनेक दिवसांपासून हे दोघे एकत्रित राहत नव्हते. संयुक्तरित्या जारी केलेल्या पत्रकात दोघांनी म्हटले, की "आम्ही लोकांना आमच्या आयुष्यातील घटनाक्रमाबद्दल सांगू इच्छित आहोत. परिवार आणि मित्र मंडळींना यासंदर्भात आधीच माहिती होती. गेल्या काही दिवसांपासून ट्रायल म्हणून आम्ही एकमेकांपासून दूर झालो. आता मात्र घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आयुष्य आम्ही मित्रांप्रमाणे घालवणार आहोत.'' जेफ बेझोस यांच्या पत्नी मॅकेन्झी अॅमेझॉनच्या फाउंडर मेंबर्सपैकी एक होत्या.

 

घटस्फोट घेऊन होणार जगातील सर्वात धनाढ्य महिला!
ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सनुसार, जगातील सर्वात धनाढ्य उद्योजक जेफ बेझोस यांची नेटवर्थ जवळपास 10 लाख कोटी आहे. पत्नी मॅकेंझीला घटस्फोट घेतल्यानंतर त्यांच्याकडून तब्बल 4.76 लाख कोटी मिळण्याची शक्यता आहे. असे झाल्यास मॅकेंझी जगातील सर्वात धनाढ्य महिला होणार आहे.


लेखिका आहेत मॅकेन्झी
मॅकेन्झी एक उत्कृष्ठ लेखिका आहेत. त्यांनी द टेस्टिंग ऑफ लूथर अलब्राइट आणि ट्रॅप्‍ससह अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्या सॅन फ्रान्सिस्को येथे जन्मल्या आणि मोठ्या झाल्या. प्रिन्सटन विद्यापीठात त्या नोकरीसाठी मुलाखत देण्याकरिता गेल्या होत्या. त्याच ठिकाणी त्यांची आणि जेफ यांची भेट झाली. या दोघांना 4 मुले-मुली आहेत. गतवर्षीच एप्रिलमध्ये जर्मनीत एका कार्यक्रमात जेफ यांनी आपल्या पत्नीचे कौतुक केले होते. "आपल्याकडे प्रेम आणि सहकार्य करणारी मॅकेन्झी, माझे आई-वडील, माझे आजी-आजोबासारखे लोक असतील तर आपणही कुठलेही आव्हान स्वीकारू शकता." असे त्यांनी म्हटले होते. सद्यस्थितीला जेफ बेझोस यांच्याकडे 160 अब्ज अमेरिकन डॉलर अर्थातच जवळपास 10 लाख कोटी रुपये इतकी संपत्ती आहे. ते जगातील सर्वात धनाढ्य व्यक्ती आहेत. दोन दिवसांपूर्वीच त्यांची कंपनी अॅमेझॉनने माइक्रोसॉफ्टला सुद्धा मागे टाकले.

 

बातम्या आणखी आहेत...