आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Amazon Company Got Award Of Worlds Largest Company Due To Various Ideas And Patents

विविध कल्पना,पेटंटवर अॅमेझॉन ठरली माेठी कंपनी; अॅमेझॉनचे बाजार भांडवल 56 लाख कोटी रुपये झाले, कंपनीच्या उत्पन्नाचे स्रोत जाणून घ्या... 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अॅमेझाॅनला नुकतेच जगातील सर्वांत मोठी कंपनी होण्याचा बहुमान मिळाला आहे. अॅमेझॉनची सुरुवात ऑनलाइन बुकशॉपच्या रूपात झाली. जवळपास २५ वर्षांत ही जगातील सर्वात मोठी कंपनी झाली आहे. जेफ बेजोस स्पर्धकांपेक्षा पुढे राहण्यासाठी विविध संकल्पना व उत्पादनांचे स्वामित्व हक्क घेतात. सीबी इनसाइट्सच्या अहवालानुसार, २०१० ते २०१७ दरम्यान कंपनीने ७५२० पेटंट्ससाठी अर्ज केला आहे. यामध्ये उडणारी वेअरहाऊस, इंधन पोहोचवणाऱ्या ड्रोनचा समावेश आहे.

 

क्लाऊड सेवेत अॅमेझॉनच्या ४०% बाजारावर कब्जा 
क्लाऊड । ४०% बाजारावर ताबा 

पब्लिक क्लाऊड बाजारात ४० % बाजारावर अॅमेझाॅनची क्लाऊड सेवा अॅमेझॉन वेब सर्व्हिसेसचा(एडब्ल्यूएस) कब्जा आहे. २०१८ च्या तिसऱ्या तिमाहीत अॅमेझॉन प्रथम, मायक्रोसॉफ्ट दुसऱ्या व गुगल तिसऱ्या क्रमांकावर आहे. 
उत्पन्न - या सेवेतून अॅमेझॉनचा वार्षिक महसूल २३ अब्ज डॉलर पुढे गेला आहे. 

 

ई-कॉमर्स । जगातून कमावले १०८ अब्ज डॉलर 
फोर्ब्जनुसार, ऑनलाइन विक्रीतून अॅमेझाॅनला २०१७ मध्ये १०८ अब्ज डॉलर मिळाले. २०१५ च्या उत्पन्नाच्या ३१ अब्ज डॉलर जास्त आहे.ई-मार्केटनुसार अॅमेझॉनचा ९०% महसूल रिटेल विक्रीतून येतो. भारतात कंपनीचा ४४%(एप्रिल २०१८) वाटा आहे. 
उत्पन्न- बार्केलेज बँकेनुसार, गेल्या आर्थिक वर्षात भारतात अॅमेझॉनचा महसूल ३.२ अब्ज डॉलर राहिला. 

 

ऑनलाइन जाहिरात । १० अब्ज डॉलर उत्पन्न 
ऑनलाइन जाहिरात अॅमेझॉनचा नवा व्यवसाय आहे.गेल्या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीत अॅमेझॉनची अन्य व्यवसाय श्रेणीत १२२% वाढ झाली. ऑनलाइन जाहिरात या श्रेणीत मोडते. अॅमेझॉन यामध्ये फेसबुक व गुगलला आव्हान देत आहे. 
उत्पन्न - अॅमेझॉनने जाहिरातीतून २.५ अब्ज डॉलर मिळाले. एका वर्षात १० अब्ज डॉलर.

 

अॅमेझॉनची दोन धोरणे 
अधिग्रहण :
वित्त सेवा कंपनी मोर्गन स्टेनलीनुसार, २०२५ पर्यंत अॅमेझॉनची वाढ सर्वाधिक अधिग्रहणातून होईल. आतापर्यंत अॅमेझॉनने सुमारे ८६ हून जास्त कंपन्यांचे अधिग्रहण केले आहे. २०१७ मध्ये त्यांनी १० स्टार्टअप्स खरेदी केले.
 
गुंतवणूक : त्यांनी कमीत कमी १२८ कंपन्यांमध्ये गुंतवणूक केल्याचा अंदाज आहे. कंपनी अॅलेक्सा फंड व अॅलेक्सा अॅक्सिलरेटरसारखे कार्यक्रम राबवत असून ती व्हॉइस, इंटरनेट ऑफ थिंग्जसह अनेक तंत्रज्ञानात गुंतवणूक करते. अॅमेझॉन कॅटलिस्ट प्रोग्राम नव्या तंत्रज्ञानावर काम करणारी विद्यापीठे व महाविद्यालयांत गुंतवणूक करते. याशिवाय अॅमेझॉन कॉर्पाेरेट गुंतवणूक कार्यक्रमही करते. 
 
 

बातम्या आणखी आहेत...