आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेझॉनमध्ये इंटर्नही टॉपवर पोहाेचू शकतो, आम्ही कर्मचाऱ्यांकडून केवळ काम करून घेत नाही, तर त्यांना संधीही देतो : एचआर प्रमुख

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतात आता ऑनलाइन व्यवसाय तेजीने वाढत आहे. त्यामुळे ई-कॉमर्स क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होत आहे. दिग्गज ई-कॉमर्स कंपनी अमेझॉन देखील भारतात विस्तारासह रोजगाराच्या संधी घेऊन आली आहे. अमेझॉनमध्ये रोजगाराची संधी संदर्भात दैनिक दिव्य मराठी नेटवर्कने कंपनीच्या भारत आणि मध्य आशियातील एचआर प्रमुख दीप्ती वर्मा यांच्याशी चर्चा केली. मुलाखतीतील काही अंश...


- कंपनीला कोणत्या प्रकारचे मनुष्यबळ हवे आहे. इच्छुक उमेदवार कशा प्रकारे संपर्क करू शकतो? 
अमेझॉनचे स्वत:चे जॉब पोर्टल अमेझॉन.जॉब्स आहे. यामध्ये आम्ही शहर व विभागाच्या दृष्टीने व्हॅकेन्सीची माहिती देतो. जे वेगळ्या प्रकारे आणि विश्लेषणात्मक विचार करतात आम्ही अशांचा शोध घेत असतो. प्रश्न उपस्थित करतात. ग्राहकांची संतुष्टी, नवीन वस्तूंची निर्मितीकडे कल असणाऱ्या उमेदवार अमेझॉनची पहिली पसंद असते.


- उमेदवारातील कोणत्या गुणाला प्राथमिकता मिळते?
शैक्षणिक योग्यतेव्यतिरिक्त उमेदवारात लवचिकता व ग्राहकांप्रती त्याचा व्यवहार पाहतो, जे लोकांना ऑनलाइन शॉपिंगच्या पद्धतीला बदलण्यासाठी अमेझॉनच्या उद्दिष्टात विशिष्ट भूमिका पार पाडू शकतात.  


- कर्मचाऱ्यांना नवीन कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळते? इंटर्न लाही नोकरी मिळू शकते काय? 
आमच्या सर्वांचे नेतृत्त्व करत असलेल्या व्यक्ती नेही अमेझॉनमध्ये इंटर्न म्हणूनच कामाची सुरुवात केली होती, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आमच्याकडे एक प्रभावी इंटर्नशिप प्रोग्राम आहे. आम्ही ग्राहकांच्या गरजांनुसार कर्मचाऱ्यांची क्षमता वाढवण्यासाठी आणि नवीन कौशल्य आत्मसात करण्यास प्रोत्साहन देतो. स्वत:मध्ये मालक असल्याच्या जबाबदारीचा अनुभव येईल, अशा संस्कृतीचे आम्ही पालन करतो. 


- युवकांनी कशा प्रकारे इंटरव्ह्यूची तयारी करावी? 
अमेझॉनने कार्य प्रणालीची विशिष्ट संस्कृती विकसित केली आहे, ज्याचे मूळ १४ नेतृत्वाच्या सिद्धांतात आहे. ग्राहकांची सेवा करण्याची वृत्ती, कोणत्याही कामाची जबाबदारी घेणे, नावीन्यपूर्णतेची लालसा आणि सोप्या दृष्टिकोनातून पाहणे असे काही सिद्धांत आहे. या सिद्धांताचे पालन करून आम्ही मजबूत ग्राहक केंद्रित संस्कृती बनवली आहे. अमेझॉनच्या संस्कृतीशी पूरक गुण असलेल्या उमेदवारांचा शोध आम्ही घेतो. दूरदृष्टी असलेल्या कंपन्यांमध्ये इनोव्हेशनच्या संस्कृतीत महत्त्वाचे अंतर आहे. शैक्षणिक योग्यतेव्यतिरिक्त कंपनी उमेदवारांमध्ये ग्राहक केंद्रित गुणांचा शोध घेते. उमेदवार जबाबदारी घेणारा आणि तेजीने निर्णय घेऊन त्यावर काम करणारा असायला हवा. अमेझॉन भारतात किचकट परिस्थितीत काम करत आहे, हे त्याने समजून घ्यायला हवे. 


- भविष्याच्या दृष्टीने सध्या बिग डाटा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काय बदल होत आहे?  
आता कंपन्यांमध्ये भरती, रिटेंशन अन् कर्मचाऱ्यांची व्यग्रता सारख्या घडामोडी डाटा आधारित प्रणालीने चालत असल्याने सोप्या आणि महत्त्वपूर्ण झाल्या आहेत. बिग डेटा, आर्टिफिशियल इंटेलिजन्सी आणि मशीन लर्निंग महत्त्वाचे आहे. कर्मचाऱ्यांत नवीन बदल, नवीन आव्हाने आणि क्षमता विकसित करण्यासाठी संमेलनाच्या आयोजनातून संधी दिली जात आहे.


- तुमच्या कंपनीला कर्मचाऱ्याला  टिकवण्यास काही अडचणींचा सामना करावा लागतोय काय ?
कर्मचाऱ्याचा अनुभव कोणत्याही संघटना सोबत कर्मचारी दीर्घ काळापर्यंत थांबण्याचे कारण आहे.  अमेझॉनने २०१७ मध्ये सर्व कर्मचाऱ्यांसाठी “कनेक्शन’ नावाचे एक दैनिक पल्स सर्वेक्षण सुरू केले. यातून त्याची मनस्थिती समजून घेऊन काम करण्यासाठी चांगली परिस्थिती निर्माण केली जाते. अमेझॉनमध्ये अंतर्गत बदलीची प्रणाली, जागतिक मोबेलिटीची संधी आधीपासूनच उपलब्ध आहे.


- अमेझाॅनमध्ये विविधतेला कशा प्रकारे प्रोत्साहित केले जाते ?
आमचे कर्मचारी भविष्यासाठी प्रत्येक दृष्टिकोन, लिंग, वय, पार्श्वभूमी, अनुभव आदींनी परिपूर्ण असेल. महिलांसाठी “वुमन इन टेक्नोलॉजी ट्रेनिंग, अमेझॉन कँपस मँटरिंग सीरिज, व्हर्च्युअल कस्टमर सर्व्हिस’ सारखे अनेक कार्यक्रम आम्ही चालवत आहोत.


2026 पर्यंत भारताचा ई-कॉमर्स बाजार १४ लाख कोटी रुपयांवर
- भारत जगातील सर्वाधिक तेजीने वाढणारा ई-कॉमर्स बाजार आहे. २०१७ मध्ये हा २.७ लाख कोटी रुपयांचा होता. २०२६ पर्यंत हा १४ लाख कोटी रुपयांचा होईल.
- इंटरनेट आणि स्मार्टफोनची पोहोच यामुळे ई-कॉमर्स बाजारात तेजीत आहे. आयडीसीच्या अहवालानुसार जगभरात स्मार्टफोन विक्री कमी झाली असली तरी भारतात वाढली आहे.
- भारतातील ई-कॉमर्स बाजारात सर्वाधिक ४८% भागीदारी सध्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची आहे. नंतर कपड्यांचा क्रमांक आहे. पुढील काळात किराण्याची सर्वाधिक विक्रीही येथूनच होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...