Home | Business | Business Special | Amazon will give training to 1 lakh employees for automation

ऑटोमेशनसाठी अमेझॉन 1 लाख कर्मचाऱ्यांना देणार प्रशिक्षण, 6 वर्षांत 4.8 हजार कोटींचा खर्च

वृत्तसंस्था, | Update - Jul 14, 2019, 09:57 AM IST

वेअरहाऊसमध्ये काम करणारे कर्मचारीही शिकतील आयटी क्षेत्रातील कौशल्य

 • Amazon will give training to 1 lakh employees for automation

  नवी दिल्ली - जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अमेझॉन पुढील सहा वर्षांत त्यांच्या एक लाख कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहे. सध्या वाढत असलेले ऑटोमेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वाढता उपयोग लक्षात घेता या प्रशिक्षणात याचा समावेश करण्यात येणार आहे. कंपनीने या प्रकल्पाला “अपस्किलंग-२०२५’ असे नाव दिले आहे.


  अमेझॉनमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हे प्रशिक्षण ऐच्छिक असणार आहे. या आधारावरच त्यांना मोठे पद किंवा महत्त्वाची भूमिका देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. लवकरच कर्मचाऱ्यांना नवीन कौशल्य आत्मसात करण्याची आवश्यकता दिसून येत असल्याचे अमेझॉनच्या वतीने जारी करण्यात आलेल्या एका प्रसिद्धिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. हे कौशल्य आत्मसात केल्याशिवाय त्यांना पदावर कायम राहणे किंवा प्रगती करण्यात अडचणी येतील. या प्रकल्पात अमेझॉन वेगवेगळ्या विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाबाबत इतर कौशल्यांचेही प्रशिक्षण देणार आहे. उदाहरण म्हणून जे कर्मचारी वेअरहाऊसमध्ये काम करतात, त्यांना आयटीशी संबंधित तांत्रिक काम शिकवले जाणार आहे. त्यासाठी ते कर्मचारी तांत्रिक शिक्षण घेतलेले नसतील तरी त्यांना असे प्रशिक्षण देऊन कौशल्यात वाढ करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.


  अमेझॉनच्या एचआर प्रमुख बेथ गालेटी यांनी सांगितले की, “आमच्या यशामध्ये सर्वाधिक मोठा वाटा आमच्या कर्मचाऱ्यांचा आहे. त्यामुळे त्यांच्यात गुंतवणूक करणे आमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. कर्मचाऱ्यांसाठी अनेक चांगले पर्याय तयार व्हावेत यासाठी आम्ही त्यांना नवीन कौशल्याचे प्रशिक्षण देणार आहोत. या कौशल्याचा वापर ते कंपनीमध्ये किंवा बाहेर दोन्ही ठिकाणी करू शकतात.’
  ऑटोमेशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे भविष्यात अनेक कौशल्यांची गरज भासणार आहे. ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सच्या ताज्या अहवालानुसार मशिनरीमुळे सुमारे २ कोटी नोकऱ्या जाण्याचा धोका आहे. म्हणजेच १० वर्षांच्या आता निर्मिती उद्योगात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांतील ८.५% वाट्यावर रोबोटचे वर्चस्व होईल.


  कंपनी उघडणार मशीन लर्निंग विद्यापीठ, ९५% शुल्कही जमा करणार
  अमेझॉन त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी मशीन लर्निंग विद्यापीठ सुरू करणार आहे. हादेखील “अपस्किलिंग-२०२५’ या प्रकल्पाचा एक भाग असेल. जे कर्मचारी यात सहभागी होतील, कंपनी त्यांचे ९५ टक्के शुल्क जमा करणार आहे. मशीन लर्निंग विद्यापीठात सहभाग घेण्यासाठी कर्मचाऱ्याकडे तांत्रिक ज्ञान असणे अनिवार्य असेल. काही महिन्यांपूर्वी कर्मचारी संघटना आणि अमेझॉन यांच्यात मतभेद असल्याच वृत्त आले हाेते. कर्मचाऱ्यांची ही नाराजी दूर करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

Trending