आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - अमेझॉन इंडियाने एकूण विक्रीबाबत पहिल्यांदाच फ्लिपकार्टला मागे टाकले आहे. २०१७-१८ मध्ये अमेझॉनची एकूण विक्री सुमारे ७.५ अब्ज डॉलर (५२,००० कोटी रुपये) होती. यादरम्यान फ्लिपकार्टची एकूण विक्री ६.२ अब्ज डॉलर (४३,००० कोटी रुपये) राहिली. जागतिक अर्थविषयक सेवा देणारी संस्था बार्कलेजने एका अहवालात हा दावा केला आहे. फ्लिपकार्टच्या विक्रीमध्ये समूहाच्या उपकंपन्या मिंत्रा आणि जाबोंगच्या विक्रीचा समावेश नाही.
२०१८-१९ मध्ये अमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांच्यातील अंतर वाढणार असल्याचा अंदाजही बार्कलेजने व्यक्त केला आहे. या वर्षी अमेझॉनची एकूण विक्री ७८,००० कोटी रुपये होण्याचा अंदाज आहे. फ्लिपकार्टच्या ६०,००० कोटी रुपयांच्या तुलनेमध्ये हा अाकडा ३० टक्के जास्त असेल. वास्तविक घाऊक बिझनेस (बी-टू-बी) मध्ये अमेझॉन अद्यापही फ्लिपकार्टच्या मागे आहे. अमेझॉन इंडियाचा हा व्यवसाय गेल्या वर्षी १३,००० कोटी रुपये होता. हा फ्लिपकार्टच्या तुलनेमध्ये अर्धाच आहे. जगातील सर्वात मोठी रिटेल कंपनी वाॅलमार्टने याच वर्षी मेमध्ये फ्लिपकार्टची ७७ टक्के भागीदारी १.१५ लाख कोटी रुपयांत खरेदी केली आहे. वॉलमार्टचे हे सर्वात मोठे अधिग्रहण तर आहेच, पण त्याचबरोबर जगातील ई-कॉमर्स क्षेत्रातील सर्वात मोठा व्यवहारदेखील आहे.
अमेझॉन महसुलात दुप्पट तेजीने वाढ
अमेझॉनचा महसूल वार्षिक ८२ टक्के तर फ्लिपकार्टचा ४५ टक्क्यांच्या दराने वाढत आहे. एकंदरीत या क्षेत्रातील बाजारावर ताबा मिळवण्यासाठी दोन्ही कंपन्यांमध्ये सवलत देण्याची स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे कंपन्यांना दरवर्षी तोटा होत आहे. बार्कलेजच्या अंदाजानुसार २०१८-१९ मध्ये अमेझॉनचा १२,००० कोटी तर फ्लिपकार्टला ९,००० कोटी रुपयांचा तोटा होईल.
दोन्ही कंपन्यांना २१,००० कोटी रुपयांच तोटा
- ८-९ कोटी होती २०१७ मध्ये भारतात ऑनलाइन शॉपिंग करणारे.
- १८-२० कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे त्यांची २०२० पर्यंत.
- २.८-३.१ लाख कोटी होईल ई-कॉमर्स बाजार, सध्यापेक्षा दुप्पट.
- सर्वाधिक वाढ कपडे आणि ग्राहकोपयोगी वस्तूंमध्ये होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.