आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Amazon's Tallest Building Outside Of The United States In Hyderabad

अॅमेझाॅनची अमेरिकेबाहेरची सर्वात माेठी इमारत हैदराबादमध्ये

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

हैदराबाद - अॅमेझाॅन या जगातील सर्वात माेठ्या ई-काॅमर्स कंपनीने हैदराबादमधील गाचीबाऊलीमध्ये आपल्या आतापर्यंतच्या सर्वात माेठ्या इमारतीचे उद‌्घाटन केले. ही इमारत ३० लाख चाैरस फुटांच्या आवारामध्ये उभारण्यात आली आहे. यामध्ये १५ हजारपेक्षा जास्त कर्मचारी काम करू शकतील. भारतामध्ये दीर्घ कालावधीच्या याेजनेवर काम करत असल्याचे या इमारतीवरून सिद्ध हाेते, असे कंपनीने म्हटले आहे. अमेरिकेच्या बाहेरची ही अॅमेझाॅनची पहिली स्वत:ची इमारत आहे. त्याचबराेबर ती त्यांची जगातील सर्वात माेठी इमारत आहे. देशात अॅमेझाॅनकडे ६२ हजार कर्मचारी आहेत. याचा अर्थ जवळपास एक चतुर्थांश कर्मचारी या इमारतीमध्ये काम करतील. भारतातल्या १३ राज्यांमध्ये अॅमेझाॅनचे एकूण ५० फुलफिलमेंट सेंटर्स आहेत. देशात जवळपास दाेन लाख राेजगार निर्माण केल्याचा कंपनीचा दावा आहे. अॅमेझाॅनची ही इमारत १५ मजल्यांची आहे. येथे जुलैच्या मध्यापासूनच काम सुरू झाले, परंतु उद‌्घाटन आता झाले. सध्या या इमारतीमध्ये जवळपास सात हजार कर्मचारी काम करत आहेत. सप्टेंबरपर्यंत आणखी ८ हजार कर्मचाऱ्यांची क्षमता जवळपास वाढेल. इमारतीच्या आवारात १० लाख चाैरस फूट जागेत पार्किंगची व्यवस्थाही करण्यात आली आहे. या इमारतीत २६ ते ३० हजार कर्मचारी काम करतील असे पहिल्यांदा सांगण्यात आले हाेते, परंतु आता हा आकडा १५ हजारच्या जवळपास ठेवला आहे. भारतात अॅमेझाॅनचे सर्वात माेठे फुलफिलमेंट सेंटर (गाेदाम) हैदराबादमध्येच आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ असलेले हे गाेदाम ४० लाख चाैरस फूट पसरले आहे. वर्ष २०२० पर्यंत त्याचा विस्तार ५८ लाख चाैरस फुटांपर्यंत वाढवण्यात येईल.  भारतात येणाऱ्या वर्षात २०० काेटी डाॅलरची (जवळपास १४ काेटी रु.) गुंतवणूक करणार असल्याचे कंपनीचे संस्थापक आणि सीईआे जेफ बाेजाेस यांनी २०१४ मध्ये म्हटले हाेते. या घाेषणानंतर कंपनीने येथे जवळपास ४०० काेटी डाॅलर (जवळपास २,८०० काेटी रु.) गुंतवणूक केली आहे. वाॅलमार्ट या अमेरिकी कंपनीचे स्वामित्व असलेल्या फ्लिपकार्ट ही अॅमेझाॅनची भारतातील माेठी स्पर्धक कंपनी आहे. सध्या फ्लिपकार्ट ही भारतातील सर्वात माेठी ई-काॅमर्स कंपनी आहे.

पेंटागाॅनकडे जगातील सर्वात माेठे कार्यालय
कॅम्पस जगतामध्ये पेंटागाॅन या अमेरिकेच्या सुरक्षा विभागाकडे सर्वात माेठे आॅफिस कॅम्पस आहे. हा कॅम्पस जवळपास ६६ लाख चाैरस फूट जागेवर विखुरलेला आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीत अॅमेझाॅनचा हैदराबाद कॅम्पस १२ व्या स्थानावर असेल.