Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Ambaadas Bhandari's eco-friendly ganesh murti

केवळ १३ मिनिटांत विरघळणारी सुबक गणेश मूर्ती; अंबादास भंडारी यांचा इको फ्रेंडलीचा नवा प्रयोग

प्रतिनिधी | Update - Sep 01, 2018, 11:42 AM IST

प्लास्टर ऑफ पॅरिसची गणेश मूर्ती वर्षानुवर्षे तलावात राहिल्यावरही पूर्णत: विरघळून जात नाही, असे चित्र दरवर्षी उन्हाळ्यात

 • Ambaadas Bhandari's eco-friendly ganesh murti

  सोलापूर- प्लास्टर ऑफ पॅरिसची गणेश मूर्ती वर्षानुवर्षे तलावात राहिल्यावरही पूर्णत: विरघळून जात नाही, असे चित्र दरवर्षी उन्हाळ्यात कोरड्या पडलेल्या तलावात आपल्याला पाहायला मिळते. मात्र, प्लास्टर आॅफ पॅरिसचा वापर न करताही तितकीच सुबक मूर्ती मूर्तिकार अंबादास भंडारी यांनी तयारी केली आहे. घरातील बादलीत अवघ्या १३ मिनिटांत १०० टक्के विरघळून त्याचा पूर्ण चिखल गाळ होईल, असा नवा प्रयोग भंडारी यांनी साकारला आहे.


  आंध्र-तामिळनाडूच्या सीमेवर मिळाली माती
  भंडारी हे गेल्या अनेक वर्षांपासून प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार करतात. मात्र यंदाच्या उन्हाळ्यात सिध्देश्वर तलावाच्या विसर्जन कुंडातील पाणी आटले आणि गणेशमूर्तींचा खच उघड्यावर पडला. त्याचे फोटो वृत्तपत्रातून आणि सोशल मीडियातून व्हायरल झाले. त्यावेळी ते प्रचंड अस्वस्थ झाले.

  दीड ते दोन फुटांचे बाप्पा
  सुमारे दीड ते दोन फुटांचे घरगुती गणेशाच्या मूर्ती तयार केल्या असून, सध्या जुन्या वालचंद कॉलेज रोडवरील तेलुगु भाषा अभिवृध्दी वाचनालयात विक्रीसाठी उपलब्ध केल्या आहेत. एक रंगी किंवा बहुरंगी मूर्ती उपलब्ध असून, शास्त्रोक्त पध्दतीने सोंड व हात - पायांची रचना करण्यात आली आहे. मूर्तिकार भंडारी यांना ८४२१११८०३० वर संपर्क साधता येईल.


  हल्ली पर्यावरण संवर्धनासाठी अनेक उपक्रम राबवले जातात. त्यासाठी ही मूर्ती म्हणजे उत्तम उदाहरण ठरली आहे. शिवाय गणेशाच्या मूर्ती पाण्यात विरघळल्या नाहीत अन् उन्हाळ्यात त्या मूर्ती उघड्यावर पडल्या तर एक प्रकारे त्या देवतांची विटंबनाच होते. म्हणून पीओपीच्या मूर्ती बंद करून मी या वेळी पूर्णपणे मातीच्या मूर्ती केल्या. मात्र मूर्तीच्या सुबकतेमध्ये कुठेही तडजोड केली नाही.

  - अंबादास भंडारी, मूर्तिकार

Trending