आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबादास दानवे विधान परिषदेवर? शिवसेनेकडून पुढील आठवड्यात दाखल करणार उमेदवारी अर्ज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई / औरंगाबाद - शिवसेना औरंगाबादचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांची विधानपरिषदेला वर्णी लागणार हे जवळपास निश्चित झाले आहे. अंबादास दानवे शिवसेनेच्या वतीने पुढील आठवड्यात उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहेत. दानवेंना विधानपरिषदेचे सदस्यत्व मिळवून देण्याच्या तयारीची आधीच चर्चा सुरू होती. औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसकडून सुभाष झांबड यांचे नाव चर्चेत आहे. यासोबतच, अंबडचे बाबुराव कुलकर्मी आणि कन्नडचे संतोष कोल्हे यांच्या नावांची चर्चा आहे.

बातम्या आणखी आहेत...