आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ambani Daughter Eating Gol Gappa And Fiance Anand Waiting After Engagement Ceremony Viral Photo

पाणीपुरीचा आनंद घेताना दिसली अंबानींची मुलगी, एंगेज्मेंट सेरेमनीनंतर व्हायरल होतो ईशा-आनंदचा हा Photo

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बिझनेसमन मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची कन्या ईशा अंबानी हिचा साखरपुडा उद्योगपती अजय पीरामल यांचा मुलगा आनंद पीरामलसोबत इटलीतील लेक कोमो येथे झाला. दोघांच्या शाही साखरपुड्याचे फोटोज आणि व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. इव्हेंटमधील ईशाचा एक फोटो समोर आला असून यामध्ये ती पाणीपुरीचा आनंद घेताना दिसतेय. फोटोत तिचा भावी पती तिच्या मागे उभा दिसतोय. एंगेज्मेंट सेरेमनीत ईशाने वडील मुकेश अंबानींचा हात पकडून एन्ट्री घेतली होती. यावेळी ईशा गोल्डन कलरच्या डिझायनर गाऊनमध्ये तर मुकेश अंबानी व्हाइट कलरच्या सूटमध्ये दिसले होते.

 

तीन दिवस चालला सोहळा... 
- ईशा अंबानी आणि आनंद पीरामल यांचा शाही साखरपुडा इटलीतील लेक कोमो येथे 21 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर या काळात झाला.
- अंबानी कुटुंबीयांनी पाहुण्यांसाठी खास इटॅलिनय फूडची व्यवस्था केली होती.
- तीन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात पाहुण्यांसाठी ड्रेस कोड ठेवण्यात आला होता. पहिल्या दिवशी लंचवेळी कॅज्युअल ड्रेसअप हा ड्रेस कोड ठेवण्यात आला होता. तर संध्याकाळी सगळ्यांना ब्लॅक कोट, पँटसोबत व्हाइट शर्ट आणि ब्लॅक टाय हा ड्रेस कोड फॉलो करावा लागला. 
- दुस-या दिवशी इटॅलियन फिएस्टामध्ये पाहुण्यांनी Como Chic लूक फॉलो केला. डिनरसाठी कॉकटेल अटायर हा ड्रेस कोड होता. - शेवटच्या दिवशी फेअरवेल लंचमध्ये गेस्ट स्मार्ट कॅज्युअल ड्रेसमध्ये दिसले.
- अमेरिकन गायक जॉन लेजेंडच्या लाइव्ह परफॉर्मन्सने ईशा आणि आनंद यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला चारचाँद लावले.
- फंक्शनमध्ये अनिल कपूर आणि जान्हवी कपूर यांच्याव्यतिरिक्त सोनम कपूर आणि तिचे पती आनंद आहुजा, प्रियांका चोप्रा आणि तिचा भावी पती निक जोनास, आई मधू चोप्रा, भाऊ सिद्धार्थ चोप्रा सहभागी झाले होते. 
- याशिवाय जुही चावला, मनीष मल्होत्रा, आदर पूनावाला हे सेलब्सही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. 
- मनीष मल्होत्रा त्यांची मैत्रीण आदर पूनावालासोबत प्रायव्हेट जेटने लेक कोमो येथे पोहोचले होते.


कोण आहेत आनंद पीरामल...
33 वर्षीय आनंद हे पीरामल ग्रुपचे संस्थापक अजय पीरामल यांचे ज्येष्ट चिरंजीव असून त्यांनी युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्वेनिया येथून इकोनॉमिक्समध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी हॉवर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीए केले. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ई-स्वास्थ आणि पीरामल रिअॅलिटी हे दोन स्टार्टअप सुरु केले. सोबतच ते पीरामल ग्रुपचे एग्झिक्यूटिव्ह डायरेक्टर आहेत. ‘इंडियन मर्चट चेम्बर’च्या यूथ विंगचे ते सर्वात कमी वयाचे अध्यक्ष राहिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...