आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधीकाळी या चाळीत अंबानी कुटुंबातील एवढे सदस्य राहत होते एकत्र, फोटो पाहून विश्वासही बसणार नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सध्याच्या काळात अंबानी कुटुंबाला कोणत्याही ओळखीची आवश्यकता नाही. देशातील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये समावेश असलेल्या या कुटुंबाकडे अब्जो रुपयांची संपत्ती आहे. आज आम्ही तुम्हाला या कुटुंबाविषयी अशाच काही खास गोष्टी सांगत आहोत. यापूर्वी तुम्ही याविषयी कदाचित कधी ऐकले किंवा वाचले नसेल.


देशातील सर्वात धनाढ्य व्यक्ति अर्थात गुजराती बिझनेसमन मुकेश अंबानी यांचा यमनमधील अदेन शहरात जन्म 19 एप्रिल, 1957 रोजी झाला. मात्र, त्यांचे बालपण मुंबईतील भुलेश्वर चाळ व कुलाब्यातील See Wind अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये गेले. आज मात्र ते जगातील सर्वात महागडे व आकाशाला भिडणार्‍या ‘एंटीलिया’मध्ये राहातात.


आजही भुलेश्वर चाळ मुकेश अंबानींच्या स्मरणात...
मुकेश अंबानींचे वडील धीरूभाई अंबानी यांनी भुलेश्वर चाळमधील छोट्याशा खोलीत आपला बिझनेस सुरु केला होता. मुकेश व अनिल यांचे बालपण देखील याच खोलीत गेले. आज मुकेश अंबानी ‘एंटीलिया’मध्ये राहात असले तरी त्यांना भुलेश्वर चाळीतील घराचा विसर पडलेला नाही. एका इंटरव्ह्यूमध्ये मुकेश अंबानी यांनी भुलेश्वर चाळ व कुलाब्यातील फ्लॅटचा खास उल्लेखही केला होता.


भुलेश्वर चाळीत सुरु केला मसाल्यांचा बिझनेस...
यमनमधील अदेन शहरात 8 वर्षे राहिल्यानंतर धीरूभाई अंबानी मुंबईत आले. भुलेश्वर चाळीतील एका छोट्याशा खोलीत मसाल्यांचा बिझनेस सुरु केला होता. धीरूभाई व  कोकिळेबेन आपल्या दोन मुलांसोबत (मुकेश व अनिल) 1970 पर्यंत चाळीतच रा‍हिले.


धीरूभाई यांनी आपल्या सचोटी व परिश्रमाच्या जोरावर अल्पावधीत यश संपादन केले. बिझनेस भरभराटीला आल्यानंतर त्यांना आर्थिक सुबकता आल्यानंतर अंबानी फॅमिली कुलाब्यातील See Wind अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाले होते. 14 व्या फ्लोअरवर धीरुभाईंनी एक ब्लॉक खरेदी खेला होता.


हिल ग्रेंज हायस्कूलमध्ये झाले शिक्षण...
मुकेश यांचे माध्यमिक शिक्षण पेडर रोडवरील हिल ग्रेंज हायस्कूलमध्ये झाले. नंतर त्यांनी माटुंगा येथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमधून 'केमिकल इंजीनियरिंग'ची पदवी घेतली. 1980 मध्ये मुकेश यांनी अमेरिकेतील स्टेनफोर्ड यूनिव्हर्सिटीत एमबीए केले.


मुकेश अंबानी आज राहातात आकाशाला भिडणार्‍या घरात...
मुकेश अंबानी हाऊसचे नाव ‘एंटीलिया’ हे एका मिथिकल आयलंडच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. 'सूर्य कमळ' या थीमवर या बंगल्याची निर्मिती करण्‍यात आली आहे. 4 लाख स्क्वेयर फूट जागेतील बंगला 27 मजली आहे. 6 मजले हे पार्किंग व गॅरेजसाठी सोडण्‍यात आले आहे. घराचे छत क्रिस्टलने सजवण्यात आले आहे. एक थिएटर, तीन हेलिपेड, बार व अत्याधुनिक जिम व बॉलरूम आहेत.

बातम्या आणखी आहेत...