आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयकॉनिक कार Ambassador ची भारतात पुन्हा होणार एन्ट्री, नव्या अंदाजात आणि नव्या रूपात होणार लॉन्च

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली - भारतातील कारचे प्रतिक असलेली Ambassador कार पुन्हा एकदा भारतातील रस्त्यांवर नवीन अंदाज आणि नवीन लुकमध्ये धावतांना दिसणार आहे. फ्रान्सच्या PSA समुहाने 2017 साली Ambassadorचे अधिकार पुन्हा प्राप्त केले आणि लवकरच या कारला रीलॉन्च करण्याची त्यांची योजना आहे. कंपनी भारतात इलेक्ट्रिक इंधनाचा पर्याय म्हणून लॉन्च करणार आहे. 

 
या वर्षापर्यंत होणार Ambassador कारची लॉन्चिंग
ही नवीन कार कंपनीची इलेक्ट्रिक Ambassadorसेडान कार असेल. ही Peugeot कंपनीच्या इतर कारसारखी असणार आहे. PSA Peugeot Citroen ग्रुपने अधिकृतपणे भारतात Citroen ब्रँडची घोषणा केली आहे. या दरम्यान कंपनी अॅम्बेसेडरची भारतात निर्मिती करण्याची योजना करण्याचा उल्लेख केला आहे. Ambassador कार  2022 पर्यंत भारतात लॉन्च होऊ शकते.  

 
कंपनी अॅम्बेसेडर हॅचबॅक देखील लॉन्च करू शकते 
एका विशेष ऑनलाइन विक्रीच्या रणनितीचा उपयोग अॅम्बेसेडर ब्रँडेड कारची विक्री करण्याची शक्यता आहे. कंपनी सुरुवातीला एक कॉम्पॅक्ट एसयूव्ही किंवी क्रोसओव्हर स्टाईल कार लॉन्च करू शकते आणि त्यानंतर हॅचबॅक लॉन्च करू शकते. CarandBike मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार Ambassador ब्रँडचा उपयोग फक्त भारतात विकल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी करण्यात येणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...