आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ambati Rayudu Had Announced His Retirement 2 Months Back, After Deciding To Retire

अंबाती रायुडूने निवृत्तीचा निर्णय घेतला मागे, 2 महिन्यांपूर्वी निवृत्ती घोषित केली होती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट डेस्क- भारतीय फलंदाज अंबाती रायुडूने क्रिकेटमधून घेतलेल्या निवृत्तीचा निर्णय परत घेतला आहे. दोन महिन्यांपूर्वी रायडून सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. 33 वर्षीय रायुडूने हैदराबाद क्रिकेट असोसिएशन(एचसीए) पत्र लिहीले की, भावनेच्या भरात निवृत्ती घेतली होती, पण आता परत येण्याची इच्छा आहे आणु पुढील सलेक्शनसाठी तयार असेल.


गुरुवारी रायुडूने एचसीएच्या सीओएला ई-मेलमध्ये लिहीले, 'मी तुम्हाला सांगू इच्छितो की, घेतलेली निवृत्ती परत घेतली असून सर्व फॉरमॅटमध्ये परत खेळू इच्छितो. मी यासाठी चेन्नई सुपर किंग्स, वीवीएस लक्ष्मण आणि द्रविडला धन्यवाद देऊ इच्छितो, ज्यांनी माझ्या कठीण प्रसंगी माझी साथ दिली आणि माझ्यात अजून खूप क्रिकेट बाकी असल्याची भावना जागृत केली. 'मी हैदराबादच्या टॅलेंटेड टीमसोबत शानदार सीजन खेळण्यासाठी उत्सुक आहे.मी 10 सप्टेंबरपासून हैदराबाद टीम ज्वॉइन करण्यासाठी उफलब्ध आहे.'

विश्व चषकाच्या 15 जणांच्या संघाची घोषणा झाली तेव्हा निवड समितीने विजय शंकरच्या थ्री-डायमेंशनचा मुद्द समोर आणून रायुडूवर टीका केली होती, त्यानंतर रायडूने ट्वीट केले होते की, विश्वचषक पाहण्यासाठी थ्री-डी ग्लासेस ऑर्डर केले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...