आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबाजाेगाईच्या तरुणीचा पुण्यात खून करून लातूरच्या प्रियकरानेही केली अात्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - प्रेम प्रकरणातून १९ वर्षीय प्रेयसीचा वायरने गळा अावळून प्रियकराने स्वत:ही गळफास घेऊन अात्महत्या केली. ही घटना पुण्याच्या नवी सांगवीतील अाैंध उराे रुग्णालयाच्या कर्मचारी वसाहतीत उघडकीस आली. अादिती श्यामसुंदर बिडवे (१९, अंबाजाेगाई) असे खून झालेल्या तरुणीचे नाव अाहे. नईमाेद्दीन बिल्काेसाेद्दीन शहा (२१,लातूर) असे अात्महत्या केलेल्या तरुणाचे नाव अाहे.     


नईमाेद्दीन व अादिती अंबाजोगाईच्या एकाच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. काही महिन्यांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध हाेते. अादिती ही शिक्षणासाठी ४ महिन्यांपूर्वी पुण्यातील सांगवी भागात राहणाऱ्या चुलत्यांकडे राहण्यास गेली. मंगळवारी दुपारी १ वाजता प्रियकर नईमाेद्दीन लातूरहून पुण्यातील तिच्या घरी अाला. या वेळी घरी काेणी नव्हते. कुठल्या तरी कारणावरून दाेघांमध्ये  प्रचंड वाद झाला. रागाच्या भरात नईमाेद्दीनने आदितीचा वायरने गळा अावळून खून केला. त्यानंतर त्याने स्वत:ही फॅनला अाेढणी बांधून गळफास घेऊन अात्महत्या केली. काही वेळाने अादितीचा चुलत भाऊ घरी अाल्यानंतर त्याने घराची बेल वाजवली. मात्र, घरातून काेणताही प्रतिसाद मिळाला नाही.

 

त्यामुळे मित्राच्या मदतीने त्याने दरवाजा ताेडला असता अादिती मृत अवस्थेत पडलेली, तर नइमाेद्दीन याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून अाले. त्यामुळे त्याने याबाबत तातडीने पाेलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच वरिष्ठ पाेलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. दरम्यान, याप्रकरणी तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...