आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णवाहिका पूर्ण करणार रुग्णांची अंतिम इच्छा, मुलांची भेट घडवेल, फिरवेलही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रुग्णालयात नेताना महिलेस आइस्क्रीम खाऊ घालताना डॉक्टर. - Divya Marathi
रुग्णालयात नेताना महिलेस आइस्क्रीम खाऊ घालताना डॉक्टर.

सिडनी - ऑस्ट्रेलियात रुग्णांची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी एक निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार गंभीर आजार असलेल्या रुग्णांची अंतिम इच्छा रुग्णवाहिका पूर्ण करेल. जर त्यांना त्यांच्याकडे असलेल्या पाळीव प्राण्यास, त्यांच्या मुलांना अथवा नात-नातींना भेटण्याची इच्छा असेल अथवा एखाद्या आर्ट गॅलरी व संग्रहालयास भेटण्याची इच्छा  व्यक्त करतील तर ही रुग्णवाहिका त्यांची शेवटची इच्छा निश्चितच पूर्ण करेल. त्यांच्यासोबत असलेले अधिकारी रुग्णांना आइस्क्रीम खाऊ घालताना दिसतील. ऑस्ट्रेलियात एका महिलेस काही दिवसांपूर्वी रुग्णालयात नेताना बीचवर नेण्यात आले होते. त्या वेळचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर ही बाब चर्चेचा विषय ठरली. यापासून प्रेरणा घेत क्वीन्सलँडचे आरोग्यमंत्री स्टीव्हन माइल्स यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे ठरवले. याच आठवड्यात त्यांनी इच्छा पूर्ण करणारी रुग्णवाहिका सुरू करण्याची घोषणा केली होती. 

 

रुग्णांच्या इच्छा पूर्ण करणे आव्हानात्मक : मंत्री
क्वीन्सलँडचे आरोग्यमंत्री  स्टीव्हन माइल्स यांनी सांगितले, लोकांच्या शेवटच्या इच्छा पूर्ण करणे आव्हानात्मक असते. कारण त्या अवस्थेत आपण एका निश्चल धड उठूही शकत नाही व बसूही शकत नाही अशा रुग्णाची मदत करत आहात. त्यांना अनेकदा ऑक्सिजनही लावावे लागू शकते. ऑस्ट्रेलियाचा हा निर्णय नेदरलँडमधील एका कार्यक्रमावर आधारित आहे. 

बातम्या आणखी आहेत...