आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ambulance Worker Told She Had Just Months To Live Two Days After Her Dream Wedding

लग्‍नाच्‍या दोन दिवसांनंतर आलेला मेडिकल रिपोर्ट पाहुन जोडप्‍याला बसला धक्‍का

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

(ही गोष्‍ट 'सोशल वायरल सीरीज' अंतर्गत आहे. जगभरात सोशल मीडियावर अशा गोष्‍टी व्‍हायरल होत असतता, त्‍या आपण जाणून घ्‍याव्‍यात)

 

हेल -  इंग्‍लंड मधील कॉर्नवेल येथे राहणा-या एका प्रेमी युगुलाला त्‍यांच्‍या लग्‍नाच्‍या दोन दिवसांनंतर मिळालेल्‍या एका बातमीने त्‍यांच्‍या सगळ्या आनंदावर विर्जन पडले आहे. डॉक्‍टरांनी सांगितले की, नवी नवरी पोटाच्‍या कर्करोगाने ग्रस्‍त असुन, ती आता फक्‍त काही महिन्‍यांची सोबती आहे. मागील ब-याच महिन्‍यांपासून या महिलेच्‍या पोटात दुखत होते. पण तिने या दुखण्‍याकडे दुर्लक्ष केले होते.  

 

डॉक्‍टरांच्‍या सल्‍ल्‍याकडे केले दुर्लक्ष 

- कॉर्नवेलच्‍या नुकतेच लग्‍न झालेल्‍या एम्बुलन्स कर्मचारी जुलिया एलेन जोन्स आणि तिचा पती इयान एलेन यांची ही गोष्‍ट आहे. 
- जूली अॅम्‍बुलंस मध्‍ये इमरजेंसी केअर असिस्‍टंट म्‍हणून काम पाहते. नोकरी दरम्‍यान इयान सोबत तिची ओळख झाली. त्‍यानंतर दोघांनी लग्‍नाच्‍या बेडीत अडकण्‍याचा निर्णय घेतला.  
- लग्‍नाच्‍या दोन दिवसांनंतरच या जोडप्‍याला मोठा धक्‍का बसला. कारण जेव्‍हा महिलेचा मे‍डीकल रिपोर्ट आला तेव्‍हा  जुलिया गंभीर स्‍वरूपाच्‍या कर्करोगाने ग्रस्‍त असुन फक्‍त काही महिन्‍यांची सोबती असल्‍याचे डॉक्‍टरांनी सांगितले. 
- जुलियाला पोटदुखीशिवाय इतर कोणताही त्रास नव्‍हता. ज्‍या अल्ट्रासाउंड रिपोर्टने तिला आजाराबद्दल समजले ती चाचणी करण्‍यास देखील ती तयार नव्‍हती. तिला असे वाटायचे की पूर्णपणे बरी आहे. पण लग्‍नाआधी केलेल्‍या चाचणीने तिचा गैरसमज दूर झाला. 

 

डॉक्‍टरांचे म्‍हणणे आहे की आता जास्‍त वेळ नाही 

- डॉक्टरांचे म्‍हणणे आहे की, जुलिया च्‍या शरीरातील कर्करोगाच्‍या गाठी ऑपरेशनद्वारे काढता येणार नाहीत्  असे केल्‍यास जुलियाला जीव गमवावा लागेल. सध्‍यातरी किमोथेरपीद्वारे जुलियावर उपचार सुरू आहेत.  
-  ह्या आजारामुळे मी इयान सोबत माझी पहिली वेडिंग अॅनिव्‍हर्सरी साजरी करू शकणार नाही. तसेच ख्रिसमस ला देखील मी त्‍याच्‍यासोबत नसणार. आणि माझ्या नातवंडांना त्‍यांच्‍या वाढदिवसाच्‍या मी त्‍यांनी शुभेच्‍छा देऊ शकणार नाही. 
- भविष्‍यात मी त्‍यांच्‍यासोबत नसणार त्‍यामुळे आतापासूनच त्‍यांच्‍यासाठी पुढील चार वर्षांसाठी शुभेच्‍छा पत्र घेऊन ठेवले आहेत.  
- जुलिया स्‍वत:ची दु:खमय गोष्‍ट सोशल मिडीयावर शेअर करत इतरांना जागृत करत आहे. ज्‍यामुळे इतर लोक आपल्‍या आरोग्‍याची काळजी घेतील. योग्‍य वेळी वैद्यकिय तपासणी करतील आणि पुढे होणा-या धोक्‍यापासुन सावध होतील.

 

बातम्या आणखी आहेत...