Marriage / अमेरिका : एक वर्षे डेट केल्यानंतर 100 वर्षाच्या जोडप्याने केले लग्न

वय सर्वात महत्वाचे, याचा म्हातारपणाशी काही संबंध नाही

वृत्तसंस्था

Jul 14,2019 10:04:00 AM IST

ओहिया - वय सर्वात महत्वाचे असते. याचा म्हातारपणाशी काही संबंध नाही. ही गाेष्ट १०० वर्षाच्या एक जोडप्याने सिद्ध करून दाखवली. या नवविवाहित दाम्पत्याचे नाव जॉन (१००) व फीलिस (१०२) असे आहे. त्यांनी बुधवारी लग्न केले. गेल्या एक वर्षापासून दोघे डेटवर होते. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, जॉन यांनी दुसऱ्या महायुद्धात भाग घेतला होता. दहा वर्षांपूर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले. तर फिलिस या एक वृद्धाश्रमात राहात होत्या.


१५ वर्षापूर्वी त्यांच्याही पतीचे निधन झाले. गेल्या वर्षी त्यांची जॉनसोबत ओळख झाली. त्या मूळच्या व्हर्जिनियातील आहेत. फीलिस ८ ऑगस्ट रोजी १़०३ वर्षाच्या होतील. लग्नानंतर जॉन म्हणाले, मी फिलिसपेक्षा लहान आहे. परंतु आमचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. त्यामुळेच आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला, असे ते म्हणाले.

X
COMMENT