अमेरिका / अमेरिका : अपोलो ११ मोहिमेच्या ५० वर्षपूर्तीनिमित्त जानेवारीपर्यंत प्रदर्शन, चंद्रावरील पहिले पाऊल ठेवल्याचा क्षण पुन्हा साकारणार

या प्रदर्शनात अंतराळ मोहिमेसंबंधीच्या विविध वस्तू पाहण्याची लोकांना संधी 

वृत्तसंस्था

Jul 18,2019 10:09:00 AM IST

वॉशिंग्टन -छायाचित्र सिएटलच्या फ्लाइट संग्रहालयात मांडलेल्या अंतराळवीर ऑल्ड्रिन यांच्या एक्स्ट्रा वेहिक्युलर हातमोजांचे आहे. ‘डेस्टिनेशन मून’ नावाने हे प्रदर्शन भरवण्यात आले. अपोलो-११ चांद्रमोहिमेला ५० वर्षपूर्तीच्या निमित्ताने संग्रहालयातील प्रदर्शन पुढील वर्षी जानेवारीपर्यंत खगोलप्रेमींसाठी खुले राहील. त्यात लोकांना अंतराळ मोहिमेसंबंधीच्या विविध वस्तू पाहता येतील. ह्यूस्टन अंतराळ केंद्रात अलीकडेच नवनिर्मित अपोलो मोहिमेचा नियंत्रण कक्षही लोकांसाठी खुला झाला आहे. या आठवड्यात या सेंटरमध्ये ट्राम टूर, पॉप अप सायन्स लॅब, नासाच्या प्रमुख प्रकल्पांच्या प्रक्षेपणाबद्दल अंतराळवीरांकडून अनुभव कथन, अपोलोच्या अभियंत्यांद्वारे काही प्रेझेंटेशनचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. १९ जुलै रोजी खगोलप्रेमींना नासाचे फ्लाइट संचालक जीन क्रेंज यांच्याशी थेट संवाद साधण्याचीही संधी मिळणार आहे. चंद्रावर नील आर्मस्ट्राँगने पहिले पाऊल ठेवले होते. हा ऐतिहासिक क्षण पुन्हा साकारला जाणार आहे.

मोहिमेवर आधारित चित्रपट
> संग्रहालयातील थिएटरमध्ये मोहिमेवर आधारित चित्रपट स्पेस आेडिसी दाखवतील.
> डेस्टिनेशन मून प्रदर्शनात अपोलो-११ कमांड मॉड्यूल व दुर्मिळ कलाकृतीही पाहता येतील.
> स्मिथसन संग्रहालयात नील आर्मस्ट्राँगचा संरक्षित स्पेस सूटही पाहता येईल.

X
COMMENT