आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-रशियातील क्षेपणास्त्र प्रणाली करारावर अमेरिका निर्बंध लावण्याची शक्यता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारत-रशियातील एस-४०० क्षेपणास्त्र हवाई संरक्षण प्रणाली खरेदीचा करार अंतिम टप्प्यात अाहे. ४.५ अब्ज डॉलरमध्ये पाच प्रणालीच्या खरेदीसंबंधीचा करार ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होऊ शकतो. भारत-रशिया परिषदेत त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे ट्रम्प प्रशासनाने हा करार महत्त्वपूर्ण मानला जाईल, असे सांगून निर्बंध लावले जातील, असा इशारा शुक्रवारी दिला आहे. शुक्रवारी चीनवर व रशियावरही निर्बंध लागू करण्यात आले. 


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी गुरुवारी निर्बंधांसंबंधी कायद्याच्या मसुद्यावर स्वाक्षरी केली. त्यात अमेरिकेच्या हितसंबंधांना धोका निर्माण करणारे देश, परदेशी संस्था व व्यक्तींवर निर्बंध लावण्याची तरतूद आहे. आम्ही कोणत्याही देशाच्या लष्करी क्षमतांना कमी करू इच्छित नाही. मात्र रशियाच्या हालचालींवर दबाव आणणे, असा आमचा त्यामागील उद्देश आहे. या कायद्याद्वारे अमेरिकेने चीनच्या लष्करी विभागावर रशियाकडून सुखोई लढाऊ विमान व एस-४०० क्षेपणास्त्र खरेदीवर निर्बंध लादले. याअगोदर काट्साअंतर्गत इराण, उत्तर कोरिया व रशियावर अनेक निर्बंध लावलेले आहेत. अमेरिकेने आगीशी खेळणे चुकीचे आहे. हा मूर्खपणा ठरेल, असा इशारा रशियाने दिला आहे. 


निर्बंध लादण्याची चूक सुधारा; चीनची प्रतिक्रिया 
चीनच्या लष्करी विभागावरील निर्बंध अमेरिकेने तत्काळ उठवावेत, अन्यथा संघर्षाची स्थिती निर्माण होऊ शकते, अशा तीव्र शब्दांत चीनने प्रतिक्रिया दिली आहे. ट्रम्प प्रशासनाने ही घोडचूक केली आहे. आंतरराष्ट्रीय नियमांची पायमल्ली करणे अमेरिकेला शोभणारे नाही. आशियात अशा प्रकारचा हस्तक्षेप करणे चुकीचे आहे. त्यातून परस्पर लष्करी संबंध बिघडण्याची शक्यता आहे. म्हणूनच अमेरिकेने आपली चूक सुधारली पाहिजे, असा आमचा त्यांना सल्ला आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शाँग यांनी म्हटले आहे. चीनने मुत्सद्द्यामार्फत ही प्रतिक्रिया नोंदवली आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...