Home | International | Pakistan | america barak obama warned pakistan

अमेरिका-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला, ओबामांची पाकिस्तानला धमकी

Agency | Update - May 22, 2011, 05:26 PM IST

अमेरिका आणि पाकिस्तानच्या संबंधात दिवसेंदिवस तणाव वाढत असल्याचे चित्र आहे

  • america barak obama warned pakistan

    इस्लामाबाद - अमेरिका आणि पाकिस्तानच्या संबंधात दिवसेंदिवस तणाव वाढत असल्याचे चित्र आहे. ओबामा यांनी पाकिस्तानला धमकी देताना म्हटले आहे की, पाकिस्तानमध्ये यापुढे कोणी दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली तर त्याला लादेनसारखे ठार मारण्यात येईल. तिकडे आय़एसआय़ प्रमुख अहमद पाशा यांनी अमेरिकेला चेतावणी देताना ड्रोन हल्ले बंद करावेत नाहीतर पाकिस्तान त्याला प्रत्युत्तर देईल असे म्हटले आहे.

    अमेरिकेने यापूर्वीच अल कायदाच्या दहशतवाद्यांविरुद्ध जगात कोठेही कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतू 2 मे रोजी लादेनला पाकिस्तानमध्ये मारल्यानंतर ओबामा यांनी पाकिस्तानला चेतावणी दिली आहे. तालिबानचा प्रमुख मुल्ला उमर किंवा इतर दहशतवादी पाकिस्तानमध्ये लपल्याचे स्पष्ट झाल्यास कारवाई करण्यात येणार आहे. ओबामा यांनी युरोप दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी त्यांनी पाकिस्तानला ही ताकिद दिली आहे.

Trending