आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करान्यूयॉर्क - टेक्सास येथील मायकर आणि आलियाह थॉम्पसन यांचे लग्न साखरपुडा झाल्यानंतर दोन वर्षांत तीन वेळेस कोणत्या ना कोणत्या कारणामुळे टळत होते. यावेळी देखील 21 सप्टेंबर रोजी त्यांच्या लग्नाची तारीख काढण्यात आली होती. मात्र लग्नाच्या दोन दिवसांपूर्वी मायकलचे वडील आजारी पडले आणि डॉक्टरांनी त्यांची शस्त्रक्रिया करण्यास सांगितले. यादरम्यान शस्त्रक्रिया केली असती मायकलच्या वडिलांना मुलाच्या लग्नाला मुकावे लागले असते. आणि मायकलला हे मंजुर नव्हते.
मायकलने आलियाहसोबत चर्चा केली आणि दोघांनी चर्च ऐवजी रुग्णालयातच लग्न थाटले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी देखील या दाम्पत्याला केली. आनंदामध्ये कोणतीही कमतरता राहू नये यासाठी कर्मचाऱ्यांनी फक्त पादरीलाच बोलावले नाही तर विलियम यांची प्रकृतीकडे पाहता विशेष वेडिंग केक देखील तयार केला. या लग्नाचे फोटो 12 नोव्हेंबर रोजी फेसबुक वर पोस्ट करण्यात आले.
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी वडिलांसाठी बनवला शुगर फ्री केक
लग्नानंतर आलियाहने सांगितले की, मला जेव्हा समजले की, मधुमेहासह इतर आरोग्य विषयक समस्यांमुळे मायकलच्या वडिलांची शस्त्रक्रिया होणार आहे. तेव्हा मी मायकलला सांगितले की, डॉक्टर वडिलांना लग्नासाठी चर्चमध्ये जाण्याची परवानगी देणार नाहीत. यामुळे आम्ही रुग्णालयातच लग्न करण्याचा निर्णय घेतला. आम्ही रुग्णालयातच स्टाफसोबत याविषयी चर्चा केली ते देखील यासाठी तयार झाले. परिवारातील सदस्यांसोबत रुग्णालयातील डॉक्टर्स आणि नर्स देखील या लग्नात सहभागी झाले. या दाम्पत्याने रुग्णालयातील गाऊन परिधान करून लग्नाच्या विधी पूर्ण केल्या. यानंतर चर्चमध्ये व्हेन्यू पार्टी दिली. यावेळी सगळ्यांसोबत वडिल सुद्धा आनंदी होते. कारण यावेळी लग्न थांबले असते तर त्यांना दुःख झाले असते.
प्रशिक्षण, नातेवाईकांच्या मृत्युमुळे होते नव्हते लग्न
मायकलने आपल्या वडिलांच्या उत्साहाविषयी सांगितले की, लग्नावेळी वडिलांचा उत्साह पाहण्यासारखा होता. आम्ही बऱ्याच दिवसांपासून लग्नाचा विचार करत होतो. मात्र माझे सैन्याचे प्रशिक्षण आणि काही नातेवाईकांच्या मृत्युमुळे लग्न होत नव्हते. यावेळी सुद्ध असे व्हावे असे वडिलांनी इच्छा नव्हती. आलियाह त्यांना मुलीपेक्षा कमी नाही. यामुळे त्यांची इच्छा होती की यावेळी लग्न व्हावे. मी आणि आलियाहने त्यांचे हे स्वप्न पूर्ण केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.