Home | International | Pakistan | america deal with taliban for ladens death

अमेरिकेने केला होता तालिबानशी लादेनच्या मृत्यूचा सौदा, मुल्ला बरादरने सांगितला ठावठिकाणा

Agency | Update - May 30, 2011, 05:51 PM IST

गेल्यावर्षी अमेरिका आणि पाकिस्तानच्या संयूक्त मोहिमेत बरादरला अटक करण्यात आली होती पण चौकशी नंतर

 • america deal with taliban for ladens death

  लंडन- तालिबानने लादेनच्या मृत्यूचा अमेरिकेशी सौदा केला होता. तालिबानचा सिनिअर कमांडर मुल्ला बरादरने लादेन राहत असलेल्या पाकिस्तान मधील एबटाबाद येथील घराचा पत्ता सांगितला आणि त्याच्या बदल्यात अमेरिकेने तालिबानचा प्रभाव असलेल्या भागातील आपले सैन्य काढून घेईल असे आश्वासन दिले होते असे ब्रिटनमधील एका वृत्तपत्रात म्हटले आहे. मुल्ला बरादर हा तालिबानचा संस्थापक मुल्ला उमरचा अत्यंत विश्वासू समजला जातो.

  आतापर्यंत लादेनचा शोध अमेरिकेने कुरियर आणि त्याचा विश्वासू अबु अहमद कुवेतीच्या फोनकॉल्सवरून घेतला होता असे सांगितले जात होते पण तालिबानने लादेनचा विश्वासघात करून त्याचा पत्ता अमेरिकेला सांगितला होता असे 'मिररने' सांगितले. गेल्यावर्षी अमेरिका आणि पाकिस्तानच्या संयूक्त मोहिमेत बरादरला अटक करण्यात आली होती पण चौकशी नंतर त्याला सोडून देण्यात आले होते.

  मुल्ला बरादर हा तालिबानच्या संस्थापकांपैकी एक आहे. बरादर हा अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेशी हल्लयाच्यावेळेस सतत गोपनीय माहिती देत होता.
  पाकिस्तानमधील आपले सैन्य कमी करण्याचे अमेरिकेने नुकतेच घोषित केले होते आणि त्याप्रमाणे अमेरिका आपले तेथील सैन्य कमी करत आहे. त्याचप्रमाणे अमेरिका अफगानिस्तानमधील सैन्य देखील कमी करणार आहे.

  आपले मत
  अमेरिकेला जगातील सर्वात शक्तिशाली देश असे म्हटले जाते पण अल कायदा प्रमुख ओसामा बिन लादेन ला मारण्यासाठी त्यांना तालिबानची मदत घ्यावी लागली. तालिबान आणि अल कायदा हे अमेरिकेपेक्षा शक्तिशाली आहेत असे आपण मानावे का? आपण ही या मुद्दावर आपले मत मांडू शकता.
  सूचना: कोणत्याही आक्षेपार्ह प्रतिक्रियेस वाचक स्वत: जबाबदार असतील.Trending