Home | International | Pakistan | america decide our soldiers shortage in pakistan

पाकिस्तानकडून अमेरिकेला धमकी, सैन्य मागे घेण्यास ओबामा तयार

Agency | Update - May 26, 2011, 08:56 PM IST

अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याच्या मृत्यूनंतर पाकिस्तानमध्ये लोकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरत असल्याचे चित्र आहे.

  • america decide our soldiers shortage in pakistan

    वॉशिंग्टन - अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याच्या मृत्यूनंतर पाकिस्तानमध्ये लोकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरत असल्याचे चित्र आहे. पाकिस्तानमधील एक कट्टर समुदायाचा नाराजीमुळे पाकिस्तान सरकार अडचणीत आले असून, अमेरिकीनाही आपले काही सैन्य मागे घेण्यास सुरवात केली आहे.

    अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधून अमेरिकेने गेल्या दोन आठवड्यांपासून आपले सैन्य कमी करण्यास सुरवात केली आहे. मात्र, पाकिस्तानी सैन्याला अमेरिकन लष्करातील सुमारे २०० सैनिक प्रशिक्षण देत असून, याशिवाय अनेक अमेरिका एजंट आहेत.पाकिस्तानी सरकारच्या म्हणण्यानुसार आम्ही आमचे सैन्य कमी करीत आहोत.अमेरिकेचा पाकिस्तानी भूमीवरील वाढत्या अतिरेकामुळे पाकिस्तानमधील कट्टर गट अमेरि्केला विरोध करू लागले आहेत. हे सर्व गट लादेनच्या मृत्यूनंतर आयएसआय, पाकिस्तान सरकार आणि सैन्यावर नाराज असल्याचे चित्र आहे.

Trending