आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावॉशिंग्टन - अमेरिका-मेक्सिको सीमेवर बांधलेली 18 ते 26 फूट भिंत बेकायदेशीर स्थलांतरितांना रोखण्यात कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे. ही भिंत उभारण्यासाठी एक अब्ज डॉलरपेक्षा अधिक खर्च करण्यात आले होते. सप्टेंबर महिन्यांत ट्रम्पने कॅलिफोर्नियाच्या ओट्टे मेसा येथे भिंतीसमोर उभे राहून सांगितले होते की, जागतिक स्तरावरील गिर्यारोहकांनी भिंतीची चढाई केल्यानंतर दावा केला होता की, ही चढाई आतापर्यंतची सर्वात कठीण चढाई आहे. त्यामुळे सामान्य स्थलांतरितांना भिंत ओलांडता येणार नाही. मात्र ट्रम्प यांच्या दावा फोल ठरताना दिसत आहे.
कॅलिफोर्नियाचो फोटो जर्नलिस्ट जे उमर ओरनेल्स यांनी गेल्या मंगळवारी एक व्हिडिओ अपलोड केला होता. यामध्ये तीन स्थलांतरित 100 डॉलरपेक्षा कमी किंमत असलेल्या दोरखंडाच्या आधाराने भिंत पार करताना दिसत आहेत. ट्विटरवर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओला बुधवारपर्यंत 11 हजार वेळा रिट्वीट करण्यात आले. व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर 24 तासांत 31 हजार लाइक्स आणि 4 हजारांहून अधिक कमेंट मिळाल्या आहेत.
तिघांपैकी एका स्थलांतरिताने ओलांडली भिंत
एक प्रवासी काही सेकंदातच यशस्वीरित्या स्टीलची भिंत ओलांडत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. परंतु पेट्रोलिंग टीम पोहचल्यामुळे दुसऱ्याला पार करता आली नाही. या भिंतीबाबत ट्रम्प नोव्हेंबरमध्ये म्हणाले होते की, ड्रग्स घेऊन मोठमोठ्या भिंती पार करताना त्यांनी पाहिले होते, मात्र ही भिंत मजबूत असून ओलांडने सोपे नाही.
यावर्षी बेकायदेशीर स्थलांतरितांची संख्या 5800 पेक्षा अधिक
गेल्या एका दशकात स्थलांतरितांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. सरकारी आकड्यांनुसार, 2007 मध्ये मेक्सिकोतून अमेरिकेत घुसकोरी करणाऱ्यांची संख्या 460 होती. 2018 मध्ये हीच संख्या 2700 च्या आसपास पोहोचली होती. तर 2019 मध्ये हीच संख्या दुपटीने वाढून 5800 झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.