Home | International | Other Country | America leaves Chabahar for restrictions, clears India's path

अमेरिकेने चाबहारला निर्बंधांतून वगळले, भारताचा मार्ग मोकळा

वृत्तसंस्था | Update - Nov 08, 2018, 11:01 AM IST

त्याशिवाय अफगाणिस्तान सीमेला जोडणाऱ्या रेल्वे मार्गाचे बांधकाम करणे आता शक्य होणार आहे.

 • America leaves Chabahar for restrictions, clears India's path

  वॉशिंग्टन - भारत-इराणमधील महत्त्वाकांक्षी प्रकल्प चाबहारला अमेरिकेने इराणवरील निर्बंधातून मुक्त ठेवले आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. रणनीतीच्या दृष्टीने चाबहार अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. त्याशिवाय अफगाणिस्तान सीमेला जोडणाऱ्या रेल्वे मार्गाचे बांधकाम करणे आता शक्य होणार आहे.


  भारताने आखाती देशातील या बंदराच्या विकासात मोठी भागीदारी केली आहे. हे पाहून अमेरिकेने या प्रकल्पाला निर्बंधातून वगळले आहे. तसा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला आहे. चाबहार बंदर तसेच रेल्वे बांधकाम प्रकल्पावरून कोणत्याही वस्तूच्या आयात-निर्यातीला निर्बंधातील नियमांचा दंड बसणार नाही. यात इराणच्या पेट्रोलियम पदार्थांचाही समावेश असेल, असे ट्रम्प प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अमेरिकेने सोमवारी इराणवर आतापर्यंतचे सर्वात कठीण निर्बंध लादल्याचे जाहीर केले होते. इराणच्या वर्तणुकीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे ट्रम्प सरकारने म्हटले होते. त्यानुसार इराणवर बँकिंग तसेच तेल क्षेत्रातील बंदी घालण्यात आली. या क्षेत्रात इराणशी व्यवहार करणाऱ्या देशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे, अशी तंबी अमेरिकेने दिली .

  तीन देशांच्या सागरी व्यापाराचे बनणार केंद्र

  भारत-अफगाणिस्तान-इराण यांच्यात चाबहार बंदराचा व्यापार वाहतूक केंद्र म्हणून तिन्ही देशांसाठी वापर करण्यासंबंधी सहमती झाली होती. त्यानुसार मे २०१६ मध्ये करारही झाला. इराणमध्ये व्यापार करण्यासाठी हे बंदर अतिशय महत्त्वाचे ठरते. त्यासाठी पाकिस्तानला वळसा घालून सागरी मार्गे तीन देशांतील व्यापार वाहतूक सहजपणे करता येऊ शकते. तिन्ही देशांत व्यापाराबरोबरच प्रवासी वाहतूकही करता येणार आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या तिन्ही देशांसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरतो. त्यामुळेच भारताने निर्बंध लादू नयेत, असा दबाव वाढवला होता. शिवाय भारत हा अमेरिकेसाठी महत्त्वाचा देश आहे.

  भूमिकेबद्दल सूट

  इराणच्या आण्विक कार्यक्रमावरून संतापलेल्या अमेरिकेने इराणशी भारताला व्यापारी संबंध ठेवण्यासाठी सूट दिली. भारताने अफगाणच्या विकासात योगदान दिले आहे. ट्रम्प यांच्या आग्नेय आशिया धोरणानुसार भारताच्या शांततेमधील भूमिकेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आले.

  आधीच जाहीर केली सूट

  सोमवारी अमेरिकेने आठ देशांना तूर्त इराणसह आखाती देशांतून तेल व्यवहार करता येऊ शकतील. भारत, चीन, इटली, ग्रीस, जपान, दक्षिण कोरिया, तैवान, तुर्की यांना तेल खरेदीत घट दाखवावी लागेल.

Trending