आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमी झोपेेने अमेरिकेचा 29 लाख कोटी तोटा, 7 तास झाेपल्यास जीडीपी 16 लाख कोटी वाढेल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या झोपेच्या समस्येने जगभरातील कंपन्या त्रासल्या आहेत. त्यामुळे पूर्ण झोप घेणाऱ्यांना काही कंपन्या प्रोत्साहन देत आहेत, तर काही कार्यालयातच झोपण्याची व्यवस्था करत आहेत. अमेरिकेतील धोरणात्मक थिंक टँक समजली जाणारी रँड कॉर्पोरेशनने कमी झोपेमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीच्या आकलनासाठी ५ देशांमध्ये सर्वेक्षण केले. त्यात अमेरिका दरवर्षी सर्वाधिक २९ लाख कोटी रुपयांचे नुकसान सोसत आहे. हे तेथील जीडीपीच्या २.२८% आहे. जपानमधील नुकसान जीडीपीच्या सुमारे ३% आहे. लोक दररोज ६-७ तास झोपल्यास अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेस १५.८ लाख कोटी व जपानच्या ५.३ लाख कोटी रुपयांचा फायदा होईल. अहवालानुसार, दररोज ६ तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्यांना अकाली मृत्यू होण्याचा धोका १३% जास्त असतो. सेंटर फॉर डिसीज अँड प्रिव्हेन्शनने अमेरिकेत कमी झोप ही आरोग्याची सर्वसामान्य समस्या असल्याचे म्हटले आहे. 

 

जपानमध्ये ओव्हरटाइम ही सामान्य बाब मानली जाते.टोकियोमध्ये नेक्स्टबीट नावाच्या आयटी कंपनीने महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्लीपिंग रूम तयार केल्या आहेत. येथे मोबाइल, फोन, टॅब्लेट किंवा लॅपटॉप घेऊन जाण्यास मनाई आहे. व्यत्यय येऊ नये यासाठी बाहेचा गोंगाट ऐकू येणार नाही अशा खोल्या आहेत. 

बातम्या आणखी आहेत...