आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • America Made New Software, Intelligence Agents Would Recognize Detectives By Heartbeat

अमेरिकेने बनवले नवीन सॉफ्टवेयर, याच्या मदतीने अधिकारी परदेशी गुप्तहेरांना त्यांच्या ह्रदयाच्या ठोक्यावरुन ओळखतील

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुरक्षा विभागाची एजेंसी कॉम्बेटिंग टेरोरिज्म टेक्निकल सपोर्ट ऑफिसने जेटसन सिस्टीम विकसीत केले
  • दावा- जेटसन 200 मीटर दूरवरुन कोणत्याही व्यक्तीच्या ह्रदयाच्या ठोक्यावरुन त्याला ओळखेल

वॉशिंग्टन- पश्चिम देशांमधील गुप्तहेर संघटना परदेशी गुप्तहेरांना सॉफ्टवेयरच्या मदतीने ओळखून त्यांना पकडते किंवा मारते. हे सॉफ्टवेयर लोकांचे हावभाव आणि अंगाच्या ठेवणीवरुन त्यांची ओळख पटवतात. पण, अशा टेक्नोलॉजीमध्ये काही चुक होण्याची शक्यताही आहे. यामुळेच आता अमेरिकेच्या स्पेशल ऑपरेशन कमांड (एसओसी) ने एक नवीन सिस्टीम तयार केले आहे.


सुरक्षा विभागाची एजेंसी कॉम्बेटिंग टेरोरिज्म टेक्निकल सपोर्ट ऑफिस (सीटीटीएसओ)ने जेटसन सिस्टीम बनवले आहे. याच्या मदतीने 200 मीटर दूरवरुन कोणत्याही व्यक्तीला त्याच्या ह्रदयाच्या ठोक्यावरुन ओळखता येते. प्रत्येक व्यक्तीच्या ह्रदयाचा आकार वेगळा असतो, त्यामुळे प्रत्येकाच्या ठोक्यांचा पॅटर्नही वेगळा असता. जेटसन संबंधित व्यक्तिच्या कपड्यांवर त्याच्या ह्रदयाच्या ठोक्यांची हालचाल रेकॉर्ड करतो. सॉफ्टवेयर बनवणारी कंपनी आइडियल इनोवेशंसने याला 'हार्टप्रिंट' असे नाव दिले आहे.

डिव्हाइसची बीम संशयित व्यक्तीवर 30 सेकंत राहते

जेटसन ह्रदयाची छाप पकडण्यासाठी लेजर वाइब्रोमीटर गॅजेटचा वापर करतो. संबंधित व्यक्तीवर लेजर बीम टाकल्याने सुक्ष्म हालचालीचा अंदाज येतो. याचा उपयोग अनेक वर्षांपासून पुल, विमान, युद्ध नौकांवरील तोफ आणि विंड टरबाइनसारख्या वस्तुंच्या अभ्यासासाठी केला जात आहे. इंफ्रारेड बीम असल्यामुळे मानवीय डोळ्याने ही बीम पाहणे अवघड आहे. हे डिव्हाइस तेव्हाच चांगले काम करेल, जेव्हा संबंधित व्यक्ती एका जागेवर स्थिर आहे. या डिव्हाइसमधून निघणारी बीम व्यक्तीच्या अंगावर अंदाजे 30 सेकंद राहते.